शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय, ईडी चौकशी करणार

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय, ईडी चौकशी करणार

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत (Raj Kundra connection with underworld). राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय असल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या सूत्रांनी दिली.

Nupur Chilkulwar

|

Oct 28, 2019 | 10:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत (Raj Kundra connection with underworld). राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय असल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या सूत्रांनी दिली (ED summons Raj Kundra). अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीसोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. या प्रकरणी ईडी राज कुंद्रा यांची सोमवारी (4 नोव्हेंबर) चौकशी करणार असल्याचीही माहिती आहे, त्याबाबत ईडीने राज कुंद्रा यांना समन्स पाठवल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, राज कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत (ED summons Raj Kundra).

इकबाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत राज कुंद्रा यांनी हा व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांची दिली (ED summons Raj Kundra). रंजीत बिंद्रा हे इकबाल मिर्चीसाठी काम करत असल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांनी मिर्चीला प्रॉपर्टी डील्समध्येही मदत केल्याची माहिती आहे.

ईडी रिअल ईस्टेट कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशीलांची पडताळणी करत असताना त्यांना ही माहिती आढळली. या पडताळणीत ईसेन्शिअल हॉस्पीटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांची असून शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे.

‘2011 मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला विकली होती. एयरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमीनीचे सर्व कागदपत्र माझ्या सीएने तपासली आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. या कंपनीवर कर्जामुळेही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, त्यावेळी ही कंपनी माझ्या मालकीची नव्हती. माझ्या कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही आणि आम्ही या कंपनीसाठी कुठलंही कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे जे काही आरोप करायचे आहेत, ते या कंपनीच्या मालकांवर व्हायला हवे’, असं म्हणत राज कुंद्रा यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले.

आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सचे संलाचक रंजीत बिंद्रा आहेत. ईडीने रंजीत बिंद्रा यांना अटकही केली होती. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्ससोबत धीरज वाधवनचेही संबंध आहेत. सूत्रांनुसार, फेडरल एजन्सी त्या कंपनीचीही चौकशी करेल ज्या कंपनीची शिल्पा शेट्टी संचालक आहे.

मात्र, या प्रकऱणी ईडीकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, अद्याप राज कुंद्रा किंवा शिल्पा शेट्टीला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें