Maharashtra Rain | नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा तात्काळ मदत करा : हर्षवर्धन पाटील

नुकसानीचे पंचनामे करत बसण्यापेक्षा तात्काळ मदत करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली. (Ex Minister Harshvardhan Patil comment on Maharashtra Rain)

Maharashtra Rain | नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा तात्काळ मदत करा : हर्षवर्धन पाटील

पुणे : इंदापूर शहरात काल (14 ऑक्टोबर) मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक भागात पाणी शिरले. अनेक नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पाहणी केली. तसेच शासनाने नुकसानीचे पंचनामे करत बसण्यापेक्षा तात्काळ मदत करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली. (Ex Minister Harshvardhan Patil comment on Maharashtra Rain)

काल दिवसभर आणि रात्री इंदापूर शहरासह तालुक्यांमध्ये सुमारे 166 मिमी पावसाची नोंद झाली. इंदापूर तालुक्यात आतापर्यंत एवढा पाऊस कधीही झाला नव्हता. या मोठ्या पावसाने रस्ते वाहून गेले. अनेक घरात, दुकानात पाणी शिरले. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. संपूर्ण दळणवळण ठप्प झाले.

अजूनही काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाधित कुटुंबांना मदत द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. या मदतीसाठी वेळ न लावता ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. अनेकांना राहायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेत जमीन वाहून गेली आहे. पिके वाहून गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी काढलेले धान्य देखील खराब झाले आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात उभारलेले शेततळे वाहून गेली आहेत. पाझर तळे फुटले आहेत. अगोदरच शेतकरी हैराण झाला होता. त्यात या संकटामुळे त्याचे अजून अधिक नुकसान झाले आहे. जर 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी म्हणून जाहीर केली जाते. आता त्यापेक्षा काल दुप्पट पाऊस झाल्याने प्रशासन, जिल्हाधिकारी, नगरपालिका या सर्वांनी या कामांमध्ये मदत केली पाहिजे.

हवामान खात्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. स्थलांतरित कुटुंबाची राहण्याची, निवाऱ्याची अन्नधान्याची व्यवस्था केली जाईल. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. सामान्य नागरिकांना या समस्येतून दिलासा देण्याचे काम करावे. इंदापूर नगरपालिका नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देत आहे. छोट्या दुकानदारांना मदतीची आवश्यकता आहे. (Ex Minister Harshvardhan Patil comment on Maharashtra Rain)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Rain LIVE | राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला

साताऱ्यात रात्रभर मुसळधार पाऊस, नदीनाल्यांना पूर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत रात्रभरात सहा फुटांची वाढ

Published On - 3:44 pm, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI