महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे (Yashomati Thakur on Women Special Bus).

महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us
| Updated on: Sep 15, 2020 | 5:18 PM

मुंबई : महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे (Yashomati Thakur on Women Special Bus). त्यासोबत शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे (Yashomati Thakur on Women Special Bus).

मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे यशोमती ठाकूर यांनी विशेष बससेवा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे यासंदर्भात मागणी केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सर्व अत्यावश्यक सेवेतील शासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी विशेषतः महिलांनाही कार्यालयात किंवा कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्यू-आर कोडसहित पासेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तथापि, बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्यू-आर कोड पासेस उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे पर्यायाने त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसने प्रवास करावा लागत आहे.

बसने प्रवास करण्याकरिता दररोज तास-दोन तास बसची प्रतीक्षा तसेच बस उपलब्ध झाल्यानंतरही त्यांना दोन-तीन तास प्रवास बसने करावा लागत आहे. विशेषतः महानगरामध्ये बसने येण्याजाण्यास खूप अडचणी येत आहे. तसेच बससेवेला होत असलेली गर्दी पाहता त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय आणि खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे ॲड. ठाकूर यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने मुंबईची रणरागिणी झाली टॅक्सीचालक, यशोमती ठाकूरांच्या कौतुकाने स्मिता झगडे गहिवरल्या

Yashomati Thakur | सलोनी, ‘जिंकलंस लेकी’, मंत्री यशोमती ठाकूर यांचा फोन, बिनधास्त सलोनी भारावली

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.