प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक यशवंत भालकर यांचं निधन

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक यशवंत भालकर यांचं निधन

कोल्हापूर: प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक यशवंतराव भालकर यांचं आज पहाटे आकस्मिक निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी,मुलगी,मुलगा आणि जावई, नातू असा परिवार आहे.  यशवंत भालकर हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष तर संस्कार भारती कोल्हापूरचे विद्यमान अध्यक्ष होते. पैज लग्नाची, घे भरारी, सत्ताधीश, झुंजार, रणरागिणी, झुंज एकाकी, राजा पंढरीचा,चल गंमत करु, लेक लाडकी इत्यादी चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.

 अल्प परिचय * यशवंत लक्ष्मण भालकर – जन्म १७ एप्रिल १९५७, कोल्हापूर

*चित्रमहर्षि भालजी पेंढारकर – यांच्या ‘ तांबडीमाती आणि शाहिर दाद कोंडके यांच्या ‘सोंगाड्या सिनेमात बालकलाकार म्हणून काम

*पुढे १९७९ मध्ये द्वेस डिपार्टमेंटमध्ये इस्त्रिमन म्हणून व्यावसायीक सुरुवात.

* १९८१ मध्ये ‘डाळिंबी’ चित्रपटापासून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रुजू, जवळपास 14 वर्ष सहाय्यक दिग्दर्शक म्हणून खडतर प्रवास

* पुढे १९९७ ला स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेल्या ‘ पैज लग्नाची’ या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विक्रमी 14 राज्य पुरस्कार

* घे भरारी’ या दुसऱ्या चित्रपटास सामाजिक आशयाचा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासह ५ राज्य पुरस्कार

* ‘राजा पंढरीचा’ या भक्तीपटास ३ राज्य पुरस्कार *‘राजमाता जिजाऊ’ हा ऐतिहासीक चित्रपट लंडनमध्ये प्रदर्शित *पैज लग्नाची’ते हायकमांड’ आजवर १३ चित्रपटांचे दिग्दर्शन * ‘राधानगरी धरण ते तुळशी धरण’ अशा जवळपास ६ माहिती पटाचे दिग्दर्शन *अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सलग २ वर्षे अध्यक्ष. * 2002 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूर भूषण पुरस्कार बहाल. * श्री. सिध्देश्वर चैरिटेबल ट्रस्ट कोरोची यांच्या वतीने ” गुरु महाराज कोरोची ‘ जीवन गौरव पुरस्कार बहाल * महाराष्ट्र शासनाचे चित्रपट परिक्षण समितीचे माजी सदस्य. * वृक्षारोपन व गड किल्ल्यांची पदभ्रमंतीची आवड. * रंकाळा स्वच्छता मोहिमेचे प्रमुख शिलेदार. * आजवर – मला भेटलेली मोठी माणसं, पडद्यामागचा सिनेमा, लामणदिवा – अशा तीन पुस्तकांचे लेखन केले.

Published On - 10:49 am, Wed, 19 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI