पारनेरच्या तहसीलदारांचा विनयभंग केल्याचा आरोप, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

पारनेरच्या तहसीलदारांचा विनयभंग केल्याचा आरोप, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात भाजपचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप झाला आहे (Allegation of molestation on BJP leader Sujit Jhaware).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Sep 18, 2020 | 7:32 PM

अहमदनगर : जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात भाजपचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप झाला आहे (Allegation of molestation on BJP leader Sujit Jhaware). या प्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या तक्रारीनंतर झावरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

गुरुवारी (17 सप्टेंबर) पारनेर तहसीदार ज्योती देवरे आपल्या दालनामध्ये काम करत होत्या. त्यावेळी भाजप नेते सुजित झावरे यांनी बेकायदेशीरपणे तहसील कार्यालयाजवळ जमाव जमवला आणि तहसीदार यांच्या आदेशाची अवमानना केली. यानंतर त्यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर दबाव आणला. तसेच दमदाटी करत शिवीगाळ आणि विनयभंग केला, अशी तक्रार तहसीलदार देवरे यांनी केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरुन आरोपी सुजित झावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे आरोपी झावरे यापूर्वीही फोनवर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासोबत अश्लील भाषेत बोलले होते. तसेच महिन्याला 50 हजार रुपयांची मागणी केली. मागणीप्रमाणे पैसे न दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू, अशी धमकी दिल्याचाही आरोप तहसीलदार देवरे यांनी केलाय.

या प्रकरणी सुजित झावरे यांच्याविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम 353, 354, 385, 188, 186, 509, 141, 142, 143 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(ब), साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय.

हेही वाचा :

पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक

पुण्यात क्वारंटाईन केंद्रातील महिलेचा विनयभंग, आरोपी सुरक्षारक्षकाला अटक

दीराकडून विनयभंग, तक्रार मागे घेण्यासाठी धमकी, विद्या चव्हाणांच्या सूनेचा दावा

Allegation of molestation on BJP leader Sujit Jhaware

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें