Andhra Pradesh Fire | कोव्हिड सेंटरमध्ये भीषण आग, कोरोनाग्रस्तांसह 11 जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे एका कोव्हिड सेंटरला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली (Fire in COVID centre in Andhra Pradesh).

Andhra Pradesh Fire | कोव्हिड सेंटरमध्ये भीषण आग, कोरोनाग्रस्तांसह 11 जणांचा होरपळून मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 09, 2020 | 1:57 PM

हैदराबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अशातच आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे एका कोव्हिड सेंटरला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली (Fire in COVID centre in Andhra Pradesh). आतापर्यंत या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. हे कोव्हिड सेंटर विजयवाडामध्ये स्वर्णा पॅलेस हॉटेलमध्ये बनवण्यात आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आगीत प्राण गमावलेल्या व्यक्तींबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आंध्र प्रदेश सरकारने यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

विजयवाडाच्या स्वर्णा पॅलेस हॉटलमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांना ठेवण्यात आलं होतं. यात जवळपास 50 जणांचा समावेश होता. यापैकी 40 कोरोना रुग्ण होते. या आगीत अनेक कोरोना रुग्ण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही भीती आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

हॉटेलमध्ये शार्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. जखमींचं बचाव कार्य सुरु आहे. ही आग आज (9 ऑगस्ट) पहाटे 5 वाजता लागली होती.

आगीच्या भीतीने हॉटेलच्या मजल्यांवरुन खाली उड्या

अचानक आग लागल्याने भीतीने हॉटेलमधील अनेकांनी जिथे होते तेथून खाली उड्या घेतल्या. हे सर्व गंभीररित्या जखमी झाले आहेत. कोव्हिड सेंटरच्या बाहेरील काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. यात अनेक लोक हॉटेलच्या खिडक्यांमध्ये लटकताना दिसत आहेत. ते स्वतःला धूर आणि आगीपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. तसेच जखमींना लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या. मोदींनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना फोन करुन त्यांच्याशीही चर्चा केली. तसेच घटनेची माहिती घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील मृतांबद्दल दुःख व्यक्त करताना जखमींना बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

दरम्यान, याआधी गुरुवारी (7 ऑगस्ट) गुजरातमधील एका कोव्हिडी रुग्णालयात देखील आग लागली होती. त्या आगीत 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही आग अहमदाबादमधील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये लागली होती.

हेही वाचा :

दिल्लीत 15 ऑगस्ट आधी 350 पोलीस क्वारंटाईन, पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्यांचाही समावेश

Rajnath Singh | संरक्षण मंत्रालयाचे आत्मनिर्भर पाऊल, 101 सामुग्रींवर आयातबंदी, राजनाथ सिंहांची घोषणा

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत

Fire in COVID centre in Andhra Pradesh

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.