Rajnath Singh | संरक्षण मंत्रालयाचे आत्मनिर्भर पाऊल, 101 सामुग्रींवर आयातबंदी, राजनाथ सिंहांची घोषणा

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आत्मनिर्भर भारतासाठी मोठी घोषणा केली आहे (Rajnath Singh Atmanirbhar Bharat announcement).

Rajnath Singh | संरक्षण मंत्रालयाचे आत्मनिर्भर पाऊल, 101 सामुग्रींवर आयातबंदी, राजनाथ सिंहांची घोषणा

नवी दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आत्मनिर्भर भारतासाठी मोठी घोषणा केली आहे (Rajnath Singh Atmanirbhar Bharat announcement). यानुसार संरक्षण मंत्रालयाने भारतात येणाऱ्या 101 वस्तूंवर आयातबंदी करण्याचा निर्णय घेतला. राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत घोषणा केली. संरक्षण मंत्रालयाने या घोषणेबाबत आधीच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती दिली होती. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्या या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “संरक्षण विभाग आत्मनिर्भर भारताला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेत आहे. यानुसार संरक्षण विभाग यापुढील काळात 101 वस्तूंच्या आयातीवर बंदी घालत आहे. या वस्तूंची भारतातच निर्मिती केली जाईल.

सैन्य व हवाई दलासाठी प्रत्येकी 1 लाख 30 हजार कोटी रुपयांची सामग्री अपेक्षित आहे, तर जवळपास 1 लाख 40 हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची नौदलाकडून अपेक्षा आहे.


“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ नावाने स्वावलंबी भारतासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र आणि मागणी या 5 खांबांवर आधारित ही योजना आहे. त्यासाठी संरक्षण विभाग यापुढील काळात 101 वस्तूंच्या आयातीवर बंदी घालत आहे. या वस्तूंची भारतातच निर्मिती केली जाईल. यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी नक्कीच मदत होईल,” असं राजनाथ सिंह म्हणाले.


राजनाथ सिंह म्हणाले, “या निर्णयामुळे भारतीय संरक्षण उद्योगाला त्यांच्या स्वत:च्या डिझाइन आणि विकास क्षमतांचा वापर करून किंवा सशस्त्र सैन्याच्या गरजा भागवण्यासाठी डीआरडीओने तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘निगेटिव्ह यादी’तील वस्तू तयार करण्याची मोठी संधी मिळेल.”

“सशस्त्र दल, सार्वजनिक आणि खाजगी उद्योग यासह सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने ही यादी तयार केली आहे. भारतातील विविध दारूगोळे आणि उपकरणे तयार करण्यासाठी भारतीय उद्योगाच्या सद्य आणि भविष्यातील क्षमतांचे मूल्यांकन करण्यात येत आहे,” असंही राजनाथ सिंह यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

कोरोना संसर्गामुळे गैरहजेरी, भूमिपूजनानंतर अमित शाह यांची रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया

भारताच्या पहिल्या कोरोना लसीची किंमत किती असणार? भारत बायोटेक कंपनीचे एमडी म्हणतात….

राम मंदिरासाठी 1 कोटी रुपये आले, कुणी पाठवले माहिती नाही, त्यावर नाव शिवसेना : राम मंदिर ट्रस्ट

Rajnath Singh Atmanirbhar Bharat announcement

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *