AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ

पुण्यात कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील शिवशक्ती ऑक्सीलेट या कंपनीला आग लागली (Fire in Shiv shakti Oxalate Pune) .

पुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ
| Edited By: | Updated on: Oct 01, 2020 | 9:03 AM
Share

पुणे : पुण्यात कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील शिवशक्ती ऑक्सीलेट या कंपनीला आग लागली (Fire in Shiv shakti Oxalate Pune) . काल रात्री पावणे दोनच्या सुमारास अचानक या कंपनीत आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कंपनीत आग लागल्याने मोठ्याने स्फोटाचे आवाज येत होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीच्या घटनेचा अहवाल मागितला (Fire in Shiv shakti Oxalate Pune).

आग आणि स्फोटाची तीव्रता भयानक होती. साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावरून आग आणि धुराचे लोट दिसून येत होते. कंपनी गावापासून जवळच असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी गाव सोडून पळण्याची भूमिका घेतली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव इतर आजूबाजूच्या कंपन्यातील कामगारांना बाहेर सोडण्यात आले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीत प्रचंड प्रमाणात रासायनिक (केमिकल) साठा होता. तो जळून खाक झाला आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी वारंवार घडणाऱ्या आग व स्फोटाच्या घटना थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

घटनास्थळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कुरकुंभ, दौंड नगरपरिषद, बारामती एमआयडीसी येथील अग्निशमन बंब दाखल झाले होते. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

या गंभीर घटनेमुळे पुन्हा एकदा कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून या घटनेची माहिती देऊन ग्रामस्थांनी घाबरू नये असे आवाहन कुरकुंभ पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांनी केले. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुणीही अफवा पसरू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन महाडिक यांनी केले.

मागील पाच महिन्यातील हि दुसरी आगीची घटना आहे. यापूर्वी बुधवार 14 ऑगस्ट 2019 अल्कली आमाईन्स तसेच शुक्रवार (दि.22) मे 2020 कुसुम डिस्टीलेशन अॅन्ड रिफायनिंग, प्रा. लि. या कंपन्यामध्ये भीषण आगीच्या घटना घडल्या होत्या.

संबंधित बातम्या :

पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त

पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.