दाटीवाटीच्या लोकवस्तीत बिस्कीटच्या दुकानाआड फटाक्यांची विक्री, दीड लाखांचे फटाके जप्त

Namrata Patil

Updated on: Nov 08, 2020 | 10:34 AM

या दुकानावर बिस्कीट मार्टचा बोर्ड लावून त्याच्या आड बेकायदेशीर फटाके विक्रीचा व्यवसाय सुरु होता. (Firecracker Sale at a biscuit shop In Vasai)

दाटीवाटीच्या लोकवस्तीत बिस्कीटच्या दुकानाआड फटाक्यांची विक्री, दीड लाखांचे फटाके जप्त

वसई : बिस्कीटच्या दुकानात बेकायदेशीर फटाक्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर माणिकपूर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी दीड लाखांचे फटाके जप्त केले आहेत. याप्रकरणी मालकाला ताब्यात घेत नोटीस देण्यात आली आहे. (Firecracker Sale at a biscuit shop In Vasai)

वसई पश्चिम स्टेशन परिसरातील तुंगारेश्वर स्वीट मार्टच्या गल्लीत दाटीवाटीच्या लोकवस्तीत मनमंदिर बिस्कीट मार्टचे दुकान आहे. या दुकानावर बिस्कीट मार्टचा बोर्ड लावून त्याच्या आड बेकायदेशीर फटाके विक्रीचा व्यवसाय सुरु आहे, अशी माहिती माणिकपूर पोलिसांना मिळाली.

यानंतर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्या दुकानातून जवळपास दीड लाख रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले. तर मालकाला ताब्यात घेऊन त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र अद्याप कोरोनाचे रुग्ण कमी झालेले नाही.  यंदाच्या दिवाळीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने फटाके विक्रीवर कोणतेही नियम लागू केले नाही. तसेच विक्रीला  परवानगी देण्याबाबतही विचारविनिमय सुरु आहेत.  पण काही दुकानदार त्यापूर्वीच बेकायदेशीर फटाके विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा विक्रेत्याकडून ही फटाक्यांची खरेदी करू नये, असे आवाहन वसई पोलिसांनी केले आहे. (Firecracker Sale at a biscuit shop In Vasai)

संबंधित बातम्या :  

वृद्धाच्या भोळेपणाचा फायदा घेत एटीएमचा पिन मिळवला, खात्यातून 80 हजार लंपास

कोरोनामुळे मृत्यू आणि उघडकीस आला 6 कोटींचा घोटाळा, नामांकित 15 बँकेतील अधिकारी पोलिसांच्या रडारवर

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI