AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona : नाशिकमध्ये कोरोना कसा पोहोचला?

नाशिकमध्ये एकही रुग्ण नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, मात्र रविवारी संध्याकाळी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. (Nashik Corona patient)

Nashik Corona : नाशिकमध्ये कोरोना कसा पोहोचला?
| Updated on: Mar 30, 2020 | 1:18 PM
Share

नाशिक : भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला (Nashik Corona patient) आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सव्वा दोनशेकडे वाटचाल करत आहे. नाशिकमध्ये एकही रुग्ण नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, मात्र रविवारी संध्याकाळी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने, इथेही धाकधूक वाढली आहे. (Nashik Corona patient)

हा रुग्ण लासलगावजवळील पिंपळगावनजीक राहणारा आहे. ग्रामीण भागातील हा रुग्ण परदेशात गेलेला नसूनही पॉझिटिव्ह सापडला. मात्र तो कोणाच्यातरी संपर्कात आला असावा, त्यातूनच हा संसर्ग झाल्याचं आता स्पष्ट होत आहे.

आज सोमवारी सकाळपासून लासलगावातील सर्वच अत्यावश्यक सेवेत असलेले किराणा, भाजीपाला दुकाने बंद असल्याने शुकशुकाट दिसत आहे. निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून या परिसरतील नागरिकांच्या घरी जाऊन विचारपूस सुरू झाली आहे. नाशिक येथून 90 जणांचा समावेश असलेलं पथक आरोग्य तपासणीसाठी येत असून, या पथकाकडून पिंपळगावनजीक, लासलगाव, ब्राह्मणगाव विंचुर या तीन गावातील नागरिकांची तपासणी होणार आहे.

बेकरी व्यावसायिक नाशिक जिल्ह्यात पहिला पॉझिटिव्ह सापडलेला रुग्ण बेकरी व्यवसायिक आहे. हा रुग्ण बेकरीच्या कामासाठी मुंबई येथे दोन वेळा जाऊन आला असल्याची माहिती मिळते. यानंतर बारा मार्च रोजी त्याला खोकला, सर्दी आणि ताप आल्याने स्थानिक खासगी डॉक्टरांकडून तपासणी केली.

डॉक्टरांकडून न्यूमोनिया झाल्याचे उपचारही सुरू होते, मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने, त्याला लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. तिथून त्याला नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं. तिथे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता, 29 मार्च रविवारी संध्याकाळी तपासणी अहवालात पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

संबंधित बातम्या 

जगातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा चीन सरकारवर निशाणा    

21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.