जगातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा चीन सरकारवर निशाणा

जगातील पहिली महिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरी झाल्याचं वृत्त आहे. तब्बल 1 महिन्यांच्या उपचारानंतर ती बरी झाली. परदेशी माध्यमांनी या पहिल्या रुग्णाचा शोध लावल्याचा दावा केला आहे (First Corona Patient on China Government).

जगातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा चीन सरकारवर निशाणा

वुहान : चीनमधील वुहान शहरातून सुरु झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगभरातील 140 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. त्या हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, जगातील पहिली महिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरी झाल्याचं वृत्त आहे. तब्बल 1 महिन्यांच्या उपचारानंतर ती बरी झाली. परदेशी माध्यमांनी या पहिल्या रुग्णाचा शोध लावल्याचा दावा केला आहे (First Corona Patient on China Government). बरं झाल्यानंतर या महिलेनं चीन सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने लवकर पावलं उचलली असती तर इतक्या लोकांना आपले जीव गमवावे लागले नसते, असं मत तिने व्यक्त केलं.

अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जनरल’ने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना विषाणूची लक्षणं दिसलेली सर्वात पहिली (‘पेशेंट जीरो’) रुग्ण 57 वर्षीय वेई गायक्सिअन आहे. ही महिला चीनमधील हुन्नान प्रांताच्या माशांच्या बाजारात मासे विकण्याचं काम करते. 10 डिसेंबर 2019 रोजी या महिलेला एका सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यानंतर सर्दी-ताप आला होता.

दरम्यान, 31 डिसेंबरला वुहानच्या आरोग्य आयुक्तांनी सर्वात आधी या महिलेचं नाव कोरोना बाधित म्हणून जाहीर केलं होतं. सर्वात आधी कोरोनाचा संसर्ग झालेल्या पहिल्या 27 रुग्णांमध्ये या महिलेचा समावेश होता. या 27 रुग्णांपैकी 24 जणांना संबंधित महिला ज्या बाजारात मासे विकत होती तेथेच संसर्ग झाला होता.

या महिला रुग्णाने बरं झाल्यानंतर चीन सरकारवर निशाण साधला आहे. त्या म्हणाल्या, “सरकारने जर लवकर या आजारावर नियंत्रणासाठी पावलं उचलली असती, तर इतक्या लोकांचा जीव गेला नसता.”

पहिला रुग्ण कोण यावर अनेक दावे

चीन सरकारने संबंधित पहिली कोरोना रुग्ण बरी झाल्याचं कोणतंही अधिकृत विधान अद्याप केलेलं नाही. चीनची न्यूज वेबसाईट ‘द पेपर’ने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेच्या संसर्गाचंच वृत्त सर्वात आधी समोर आलं होतं. त्यानंतर ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांनी पहिला रुग्ण सापडल्याचा दावा केला. कोरोनाचा पहिला रुग्ण कोण यावर याआधीही अनेक दावे करण्यातआले आहेत. लॅन्सेट मेडिकल जनरलनुसार COVID-19 चा पहिला रुग्ण 1 डिसेंबरला चीनच्या वुहान येथे समोर आला होता. चीनच्या ‘ग्लोबल मीडिया’ने कोरोना विषाणू अमेरिकेच्या सैन्य प्रयोगशाळांमध्ये तयार करुन वुहानमध्ये सोडण्यात आल्याचा आरोप केला आहे.

कोरोनातून बरी झालेल्या महिलेचा प्रवास कसा?

मिरर युके या वृत्तापत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार संबंधित महिलेल्या सुरुवातीला हा साधा ताप असल्याचं वाटलं. यानंतर ती इलेवेंथ रुग्णालयात गेली. तेथे तिला तापावरील औषधे देण्यात आली. मात्र, औषधं घेऊनही ताप कमी होत नसल्यानं या महिलेला 16 डिसेंबरला वुहानच्या सर्वात मोठ्या वुहान यूनियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. येथेच डॉक्टरांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट केलं. यानंतर तिच्याशी संपर्क आलेल्या सर्वांनाच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं.

संबंधित बातम्या :
21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

धाकधूक वाढली, कोल्हापुरात कोरोना कक्षातील वृद्धाचा मृत्यू, रिपोर्ट येण्यापूर्वी मृत्यूने गाठलं

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 215 वर, मुंबई-पुण्यात रुग्ण वाढतेच

First Corona Patient on China Government

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *