कंगनाचा मणिकर्णिका ठाकरे सिनेमावर भारी, पहिल्या दिवसाची कमाई….

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतचा मणिकर्णिका (Manikarnika) हा सिनेमा ठाकरे (Thackeray) सिनेमावर भारी पडल्याचं चित्र आहे. कारण पहिल्या दिवसाच्या कमाईत कंगनाच्या मणिकर्णिकाने बाजी मारली आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी दोन्ही सिनेमांच्या पहिल्या दिवसांचे आकडे जाहीर केले आहेत. जवळपास 125 कोटी रुपये बजेट असलेल्या कंगनाच्या मणिकर्णिका (Manikarnika) सिनेमाने पहिल्या दिवशी 8 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली. […]

कंगनाचा मणिकर्णिका ठाकरे सिनेमावर भारी, पहिल्या दिवसाची कमाई....
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतचा मणिकर्णिका (Manikarnika) हा सिनेमा ठाकरे (Thackeray) सिनेमावर भारी पडल्याचं चित्र आहे. कारण पहिल्या दिवसाच्या कमाईत कंगनाच्या मणिकर्णिकाने बाजी मारली आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी दोन्ही सिनेमांच्या पहिल्या दिवसांचे आकडे जाहीर केले आहेत. जवळपास 125 कोटी रुपये बजेट असलेल्या कंगनाच्या मणिकर्णिका (Manikarnika) सिनेमाने पहिल्या दिवशी 8 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली. तर 20 ते 25 कोटी रुपये बजेट असलेल्या ठाकरे सिनेमाने पहिल्या दिवशी 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ठाकरे (Thackeray) आणि मणिकर्णिका हे दोन्ही सिनेमे शुक्रवारी 25 जानेवारीला रिलीज झाले. त्यामुळे प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

मणिकर्णिका या सिनेमात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाला करणी सेनेने आक्षेप घेतला होता. मात्र त्याला न घाबरता कंगनाने जशास तसं उत्तर दिलं.

शिवाय ठाकरे सिनेमासोबत टक्कर होऊ नये म्हणून सिनेमाची तारीख मागे-पुढे करण्याची विनंती कंगनाने फेटाळली होती. या सर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या मणिकर्णिका सिनेमाने पहिल्याच दिवशी 8 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा सिनेमा आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी जवळपास 6 कोटी रुपये कमावले. यापैकी सर्वाधिक वाटा मराठी सिनेमाचा आहे, असं तरण आदर्श यांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या 

‘मणिकर्णिका’ची पहिल्या दिवसाची कमाई 8.75 कोटी, ‘ठाकरे’ची किती?

REVIEW : मणिकर्णिका… दमदार आणि लाजवाब!  

कंगना राणावतवर अॅसिड फेकू : करणी सेना 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.