एलईडी फिशिंगविरोधात मच्छीमारांनी रणशिंग फुंकले!

गुहागर (रत्नागिरी) : हर्णे बंदरातील मच्छीमारांनी एल.ई.डी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्र सरकार जोपर्यंत या अवैध मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी उभे राहत नाही, तोपर्यंत मासेमारी उद्योग बंद ठेवण्यात येईल आणि या एल.ई.डी मासेमारी विरोधात पुन्हा एकदा समुद्रात मोठं आंदोलन करण्याचा पवित्रा येथील मच्छीमारांनी घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा समुद्रात एल.ई.डी फिशिंग आणि पारंपरिक […]

एलईडी फिशिंगविरोधात मच्छीमारांनी रणशिंग फुंकले!
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:32 PM

गुहागर (रत्नागिरी) : हर्णे बंदरातील मच्छीमारांनी एल.ई.डी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्र सरकार जोपर्यंत या अवैध मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी उभे राहत नाही, तोपर्यंत मासेमारी उद्योग बंद ठेवण्यात येईल आणि या एल.ई.डी मासेमारी विरोधात पुन्हा एकदा समुद्रात मोठं आंदोलन करण्याचा पवित्रा येथील मच्छीमारांनी घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा समुद्रात एल.ई.डी फिशिंग आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात मोठा संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

एल.ई.डी मासेमारीच्या विरोधात संपूर्ण किनारपट्टीवर सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. या मासेमारीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्णपणे बंदी असूनदेखील राजरोसपणे ही मासेमारी चालत आहे. याच विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पारंपरिक मच्छिमारांनी 26 जानेवारीला या मासेमारीविरोधात उपोषण केले होते. या उपोषणात जिल्ह्यातील बहुतांश मच्छिमार सामील झाले होते. यादिवशी पालकमंत्री रविंद्र वायकर यांची गाडी आदोलकांनी अडवली आणि एल.ई.डी फिशिंगच्या विरोधात कारवाई संदर्भात गाऱ्हाणे मांडले. परंतु याबाबत आपल्याला काही माहित नसून संबधित मंत्र्यांशी चर्चा करून पुढील 15 दिवसात आपण तुमच्या समस्येवर नक्कीच तोडगा काढू अशी ग्वाही त्यांनी दिली. परंतु या आश्वासनाची वाट न पाहता हर्णे बंदरातील मच्छीमारांनी समुद्रात संघर्ष करण्याची वेगळीच पावलं उचलली आहेत.

दरम्यान , निसर्गाच्या बदलामुळे थोडाफार परिणाम हा मासेमारीवर होतच आहे. परंतु एल.ई.डी फिशिंगमूळे संपूर्ण मासळीच समुद्रातून नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या बंदरात मासळीची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. त्यामुळे एका नौकेवर आठ किंवा चार दिवसांकरिता फिशिंग करिता लागणारे साहित्य, नोकरवर्ग यांचा लाखो रुपयांचा खर्च नौकामालकाच्या अंगावरच पडत आहे. अशा पद्धतीत सुद्धा बंदरात हजारो नौका आपला उद्योग करत आहेत. यात नौकामालकाचे अक्षरशः कंबरडे मोडत आहे. अशा या कठीण परिस्थितीत पुन्हा या उद्योगात मच्छीमारांना ठामपणे उभे राहणे कठीण होऊन बसले आहे.

या एल.ई.डी फिशिंगच्या विरोधात अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, सभा घेऊन संबधित मंत्र्यांपर्यंत निवेदनाद्वारे विषय मांडण्यात आले आहेत. तरी देखील काहीच दाद मिळत नाही. राजकीय पाठिंबा असल्यामुळेच एल.ई.डी फिशिंग बिनधास्तपणे सुरु आहे. यामुळे सर्व किनारपट्टीलगत असणारा पारंपरिक मच्छिमार मरणार आहे. याला संपूर्ण शासनच जबाबदार राहणार आहे असा आरोप येथील मच्छीमारांनी केला आहे. आता ही मासेमारी कायमची बंद झालीच पाहिजे नाहीतर आम्ही समुद्रात घुसून पुन्हा एकदा हल्लाबोल आंदोलन करू असा आक्रमक पवित्रा येथील मच्छीमारांनी घेतला आहे.

एल.ई.डी फिशिंगमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ  

शासनाची बंदी असून देखील अशाच प्रकारे एल.ई.डी फिशिंग चालू राहिली, तर आम्ही समुद्रात आक्रमण करू याकरीता आम्ही आमच्या बंदरातील मासेमारी नौका आजपासून आम्ही बंदच ठेवल्या आहेत. गेली कित्येक वर्ष एल.ई.डी फिशिंगचा हैदोस समुद्रामध्ये चालला आहे. त्यामुळे समुद्रातील माश्यांचा साठा हळूहळू संपुष्टात येऊ लागला आहे. दिवसेंदिवस हे वाढतच असल्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष नाही घेतले तर मच्छिमार आता सहन करणार नाहीत थेट समुद्रात मोठं आक्रमक आंदोलन करतील

एल.ई.डी फिशिंग म्हणजे काय

खोल समुदात जाऊन ही मासेमारी केली जाते. ही मासेमारी एका लाईटच्या सह्याने केली जाते. ही लाईट समुद्राच्या पाण्यात टाकल्यावर लाईटच्या जवळपास 5 किलोमीटर अंतरातील सर्व मासे त्या लाईटच्या  भोवती जमा होतात आणि ते जाळ्यात फसतात. अशा प्रकारे जे मासे गोळा होतात त्यातील फक्त ठराविक मासे घेऊन बाकीचे मासे ते बोट चालक फेकून देतात. त्यामुळे  लवकरच समुद्रातील मासे संपतील असे बोलले जाते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें