AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी खासदार संजय काकडेंची सपत्नीक कोर्टात हजेरी, मेहुण्याला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात जामीन

व्यावसायिक स्पर्धेतून खासदार संजय काकडे यांनी मेहुण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे

माजी खासदार संजय काकडेंची सपत्नीक कोर्टात हजेरी, मेहुण्याला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात जामीन
| Edited By: | Updated on: Nov 05, 2020 | 9:39 PM
Share

पुणे : राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) आणि त्यांची पत्नी उषा काकडे (Usha Kakde) यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मंजूर झाला. आर्थिक वादातून संजय काकडे यांनी आपल्या सख्ख्या मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवाजीनगर न्यायालयात काकडे दाम्पत्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. (Former MP Sanjay Kakde wife Usha gets bail in case of threatening brother in law in Pune)

पुणे पोलिसांनी काल संजय काकडे आणि उषा काकडे यांचा दिवसभर शोध घेतला होता. आरोपपत्र दाखल होणार असल्याचे माध्यमांना समजल्यानंतर संजय काकडे काल न्यायालयाच्या गेटवरुन माघारी गेले होते. त्यानंतर स्वतः काकडे पती-पत्नी न्यायालयात हजर झाले.

दरम्यान, हा कौटुंबिक वाद आहे. दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझं व पत्नीचं साधं बोलणंही झालेलं नसताना आताच हे आरोप का केले, याचं आश्चर्य वाटत आहे, अशी प्रतिक्रिया संजय काकडे यांनी दिली. आता याची न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. न्यायालयात आज प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयाची प्रक्रिया पाळत आहोत, असा दावाही संजय काकडे यांनी केला.

काय आहे प्रकरण?

व्यावसायिक स्पर्धेतून भाजपचे सहयोगी, माजी खासदार संजय काकडे यांनी मेहुण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात 2 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

“माझे अनेक गुंडांशी संबंध आहेत, त्यामुळे नीट रहा” अशा शब्दात संजय काकडे यांनी मेहुण्याला धमकावल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी काकडे यांचे 40 वर्षीय मेहुणे युवराज ढमाले यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. (Former MP Sanjay Kakde wife Usha gets bail in case of threatening brother in law in Pune)

कोण आहेत संजय काकडे?

संजय काकडे हे भाजपच्या पाठिंब्याने 2014 मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. अपक्ष म्हणून ते खासदारपदी निवडून आले, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एप्रिल 2020 मध्ये त्यांच्या खासदारकीची मुदत संपली. काकडे हे व्यवसायाने रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते.

संबंधित बातम्या :

माजी खासदार संजय काकडेंवर गुन्हा, मेव्हण्याला गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप

(Former MP Sanjay Kakde wife Usha gets bail in case of threatening brother in law in Pune)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.