मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय

उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. (FYJC Admission process delay due to Maratha Reservation)

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय

मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. (FYJC Admission process delay due to Maratha Reservation)

इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेबाबत उद्या (15 सप्टेंबर) मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर उपसमितीची बैठक होईल. या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.

तसेच शाळा सुरु करण्याबाबत संस्था चालकांबरोबर चर्चा झाली. मात्र संस्था चालकांची अजूनही शाळा सुरु करण्याची मानसिकता नाही. शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत जिल्ह्यातील पालकमंत्री आणि पालकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ही चर्चा झाल्यानंतरच उद्धव ठाकरे याबाबत निर्णय जाहीर करतील.

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकार यासाठी जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलं. तर मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याप्रकरणी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करु, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. (FYJC Admission process delay due to Maratha Reservation)

संबंधित बातम्या : 

मराठा आरक्षणाचा विषय सरकारतर्फे पॉझिटिव्ह, कायदेशीर बाबींवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Maratha Reservation | आरक्षण स्थगितीचा निर्णय अनाकलनीय – बाळासाहेब थोरात

Published On - 3:51 pm, Mon, 14 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI