Maratha Reservation | आरक्षण स्थगितीचा निर्णय अनाकलनीय – बाळासाहेब थोरात

आपण शासन म्हणून पूर्ण काळजी घेतली होती. हा निर्णय अनाकलनीय आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Maratha Reservation | आरक्षण स्थगितीचा निर्णय अनाकलनीय - बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Sep 14, 2020 | 3:20 PM

मुंबई : “मराठा आरक्षणाच्या संदर्भाचा सर्वोच्च न्यायालयात खटल्यात (Balasaheb Thorat On Maratha Reservation) आपण शासन म्हणून पूर्ण काळजी घेतली होती. हा निर्णय अनाकलनीय आहे”, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं (Balasaheb Thorat On Maratha Reservation).

“मराठा आरक्षणाच्या संदर्भाचा सर्वोच्च न्यायालयात खटल्यात आपण शासन म्हणून पूर्ण काळजी घेतली होती. हा निर्णय अनाकलनीय आहे. स्थगितीचा विषय नसताना न्यायालयाने हा निकाल दिला. यात पुढे कसे जायचे ते सरकार ठरवतं आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकार यासाठी जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलं. तर मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याप्रकरणी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करु, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला (Balasaheb Thorat On Maratha Reservation).

काही विषयात राजकारण करता कामा नये – बाळासाहेब थोरात

“सर्वांना एकत्र घेऊन याबाबत पुढे जायचं आहे. मुख्यमंत्री विरोधी पक्षांशी बोलले आहेत. न्यायालयात कशा प्रकारे जायचं”, असंही ते म्हणाले.

“राज्यातील वातावरण पाहता महाराष्ट्राला आणि सरकारला कसं बदनाम करता येईल, हे पाहिलं जातं आहे. याला महाराष्ट्राने तोंड दिलं पाहिजे. काही विषयात राजकारण करता कामा नये. अजून निवडणुकीला 4 वर्ष आहेत”, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी भाजपवर निशाणा साधला.

“श्रीहरी अणेंना काय घाई झाली आहे, मला माहित नाही. राज्य सरकार सर्व पर्यायांवर विचार करत आहे”, असंही ते म्हणाले.

“विधानपरीषदेच्या 12 जागांची नावं आम्ही लवकरच पाठवू. पण राज्यपालांनीही ती नावं लगेच मंजूर करावी”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat On Maratha Reservation

संबंधित बातम्या :

इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही,मग महाराष्ट्रातच का? मुख्यमंत्र्यांचा सवाल

…अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु, मराठा समाजाचा इशारा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.