AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गांधी-मंडेलांचे पुतळे तयार, वर्ध्याहून थेट आफ्रिकेत नेणार

वर्धा : जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला या दोन महापुरुषांचे शिल्प सध्या वर्धा येथे तयार होत आहे. वर्ध्यातील सेवाग्राम येथे कस्तुरबा हेल्थ सोसायटी परिसरात या शिल्पाचे काम सुरु आहे. जगाला शांतीदूत म्हणून परिचित असणाऱ्या या दोन्ही महात्म्यांच्या पुतळ्यांना दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील टॉल्स्टॉय फार्ममध्ये स्थान मिळणार. गांधीच्या 150 व्या जन्मशताब्दी निमित्ताने […]

गांधी-मंडेलांचे पुतळे तयार, वर्ध्याहून थेट आफ्रिकेत नेणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

वर्धा : जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला या दोन महापुरुषांचे शिल्प सध्या वर्धा येथे तयार होत आहे. वर्ध्यातील सेवाग्राम येथे कस्तुरबा हेल्थ सोसायटी परिसरात या शिल्पाचे काम सुरु आहे. जगाला शांतीदूत म्हणून परिचित असणाऱ्या या दोन्ही महात्म्यांच्या पुतळ्यांना दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील टॉल्स्टॉय फार्ममध्ये स्थान मिळणार. गांधीच्या 150 व्या जन्मशताब्दी निमित्ताने ऑक्टोबर महिन्यात निघालेल्या शांती यात्रेच्या निमित्ताने पुतळा सकारण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात चालना मिळाली. गांधीवादी सेवक जालंधर नाथ यांच्या माध्यमातून सेवाग्राम येथे हे शिल्प तयार होत आहेत.

नेल्सन मंडेला यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे, तर महात्मा गांधी यांची 150 वी जयंती वर्ष आहे. याचेच निमित्त साधून सेवाग्राम आश्रमचे जालंधर नाथ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दक्षिण आफ्रिका येथे शांतीयात्रा काढली. दक्षिण आफ्रिकेत या यात्रेला लोकांनी सहकार्य केले, चांगला प्रतिसाद मिळाला. येथीलच गांधीवाद्यांनी जोहान्सबर्ग येथील टॉलस्टाय फार्ममध्ये मंडेला आणि गांधीचे शिल्प असावे अशी संकल्पना मांडली होती. त्यामुळेच सेवाग्राम येथे जालंधर नाथ यांनी शिल्प आकाराला आणले आहेत. सध्या पंजाब प्रांतात शांती यात्रा पूर्ण करीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील गांधीवादी मंडळीकडून हे शिल्प दक्षिण आफ्रिकेत नेले जाईल. येत्या 2 फेब्रुवारीला हे शिल्प दक्षिण आफ्रिका येथे जाणार आहे.

तीन फूट उंच असणाऱ्या या दोन्ही शिल्पांना आकार देण्यासाठी चार जणांची टीम काम करत आहे. यामध्ये शिल्पकार अशोक वहिवटकर, गांधीवादी जालंधर नाथ आणि सचिन भेले. अतिशय काळजीपूर्वक या दोन्ही शिल्पांचे बारकावे कोरले जात आहेत. फायबरने तयार होणाऱ्या या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडेला यांची हुबेहुब हास्यमुद्रा. सध्या नेल्सन मंडेला यांचा पुतळा तयार होत आहे. तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचेही काम सूर आहे.

महात्मा गांधीजी आणि दक्षिण आफ्रिकेचे संबंध निकटचे राहिले आहेत. आफ्रिकेत गांधीजींना वर्णद्वेषाचे चटके सोसावे लागले आणि तिथे त्यांनी वर्णद्वेषविरोधी चळवळही सुरु केली होती. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सक्रीय सहभागी होण्याच्याआधी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून चळवळीत सक्रीय झाले होते. तर भारतरत्न नेल्सन मंडेला यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी दक्षिण आफ्रिका आहे. मात्र, भारताशी त्यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. गांधीजींना ते आपले गुरु मानत. गांधीजींच्या विचारांवर आपण चालत आहोत, असे त्यांनी त्यांच्या हयातीत अनेकदा सांगितले होते. म्हणूनच भारत सरकारने ज्या मोजक्या परदेशी महापुरुषांना ‘भारतरत्न’ बहाल केले, त्यात नेल्सन मंडेला यांचा समावेश होतो.

वर्ध्यात तयार होणाऱ्या गांधीजी आणि मंडेला यांच्या शिल्पातून जगाला सत्य आणि अहिंसा या तत्वांची प्रेरणा मिळेल, यात शंका नाही.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.