गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचा ‘या’ अभिनेत्यासोबत साखरपुडा

अभिनेता अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचा 'या' अभिनेत्यासोबत साखरपुडा

मुंबई : टीव्ही अभिनेता अक्षय वाघमारे याचा नुकताच साखरपुडा झाला. ‘डॅडी’ या नावाने कुख्यात गँगस्टार अरुण गवळीची कन्या योगिता गवळीसोबत अक्षय विवाहबंधनात (Arun Gawali Daughter Engagement) अडकणार आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत अक्षय-योगिताचा साखरपुडा झाला.

‘मी योगिताला गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघंही आनंदी आहोत’ असं अक्षय वाघमारेने ‘पुणे टाईम्स’ला सांगितलं.

योगिता आणि अक्षयच्या साखरपुडा समारंभाला अभिनेता क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे, हृषिकेश देशपांडे यासारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती. योगिता आणि अक्षय फेब्रुवारी 2020 मध्ये विवाहबंधनात (Arun Gawali Daughter Engagement) अडकणार आहेत.

बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीचे टिकटॉकवर सर्वाधिक फॉलोअर्स

अक्षयने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती.

Published On - 2:57 pm, Mon, 23 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI