Gatari Amavasya | राज्यभर ‘गटारी’चा उत्साह, चिकन-मटण दुकानांबाहेर मांसाहारींच्या रांगा

मुंबई-पुण्यापासून औरंगाबाद-नागपूरपर्यंत चिकन-मटण दुकानांबाहेर मांसाहारींच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

Gatari Amavasya | राज्यभर 'गटारी'चा उत्साह, चिकन-मटण दुकानांबाहेर मांसाहारींच्या रांगा

मुंबई : ‘खानेवालों को खाने का बहाना चाहिए’ असं म्हणतात, त्यात काहीच चुकीचं नाही. श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी तब्येतीत मांसाहार करण्याची संधी अस्सल खवय्ये सोडत नाहीत. ‘गटारी’च्या नावे ओळखली जाणारी आषाढी अमावस्या उद्या असली, तरी रविवारचा योग साधून अनेक जण आजच ‘गटारी’ साजरी करत आहेत. हा उत्साह राज्यभरात पाहायला मिळत असून मुंबई-पुण्यापासून औरंगाबाद-नागपूरपर्यंत चिकन-मटण दुकानांबाहेर मांसाहारींच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. तर कोलंबी, पापलेट यासारखे मासे खाण्यासाठी मत्स्यप्रेमींनीही बाजारात गर्दी केली. (Gatari Amavasya Non Veg Lovers queue outside Chicken Mutton Fish Shop Market)

मुंबईत ठिकठिकाणी चिकन-मटण दुकानांबाहेर मांसाहारींची गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाही शहरात नॉनव्हेज दुकानांबाहेर रांगा लागल्या. मुंबई उपनगरांसह वसई-विरार, ठाणे, नवी मुंबई या भागातही दुकानांबाहेर रांगा पाहायला मिळाल्या. कुठे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होताना दिसते, तर कुठे सर्रास हरताळ फासण्यात आला.

लॉकडाऊन शिथिल होताच पुणेकर धावले

पुण्यात 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सकाळपासून मटण, चिकनच्या दुकानांबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली. गेल्या पाच दिवसांपासून शहरातील ही दुकानं बंद असल्याने मांसाहारींनी धाव घेतली.

कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनपूर्वीची गटारी

कोल्हापूरमध्ये मटण मार्केटसह ठिकठिकाणच्या मटण दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या. आधीच गटारी, त्यात उद्यापासून पुढचे सात दिवस जिल्हा लॉकडाऊन असल्याने गर्दीत वाढ दिसली

नागपूरमध्ये टोकन घेऊन चिकन

रविवार आणि उद्यापासून श्रावण महिना सुरु होणार असल्याने नागपूरमध्ये चिकन मटणच्या दुकानात गर्दी होती. दुकानदारांनी टोकन पद्धत सुरु केली आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून ही पद्धत अवलंबली आहे.

कोकणात गटारीचा उत्साह

रत्नागिरीत गावठी कोंबडीला मोठी डिमांड पाहायला मिळाली. गावठी कोंबडी तब्बल एक हजार रुपयांना विकली जात होती. चिकनच्या दरात वीस रुपये, तर मटणाच्या दरात 30 रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

जळगावमध्ये मटणाच्या दुकानांवर लांबच लांब रांग लागली. मटणाचा आस्वाद घेण्याच्या नादात नागरिकांनी शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचा फज्जा उडवला.

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन उघडताच चिकन मटणच्या दुकानावर गर्दी झाली. औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या चिकन मटण मार्केटमध्ये खवय्यांच्या रांगा लागल्या होत्या.

पाहा व्हिडीओ :

(Gatari Amavasya Non Veg Lovers queue outside Chicken Mutton Fish Shop Market)

Published On - 11:55 am, Sun, 19 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI