सेल्फी व्हिडीओवरील ट्रोलिंगला उत्तर, गिरीश महाजन छातीभर पाण्यातून बचावकार्यात

पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी सांगलीत गेले असताना सेल्फी व्हिडिओ शूट केल्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन टीकेचे धनी ठरले होते. त्यानंतर महाजन यांनी पुराच्या पाण्यात उतरुत बचावकार्य करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सेल्फी व्हिडीओवरील ट्रोलिंगला उत्तर, गिरीश महाजन छातीभर पाण्यातून बचावकार्यात
Follow us
| Updated on: Aug 09, 2019 | 3:19 PM

सांगली : कोल्हापूर-सांगलीती पूरग्रस्तांच्या डोळ्यात आसू असताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) बोटीतून फिरतानाचा एक सेल्फी व्हिडीओ (Girish Mahajan Selfie video) व्हायरल झाला. महाजन मदत करण्यासाठी फिरत आहेत की पिकनिकसाठी, असा प्रश्न पडल्याने सर्व स्तरातून टीकेची राळ उठली असताना महाजनांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. महापुराच्या पाण्यात उतरुन गिरीश महाजन बचावकार्याला मदत करत असल्याचं यामध्ये दिसत आहे.

‘सांगलीमधील ज्या पूरग्रस्त भागांमध्ये आतापर्यंत कोणतीही मदत पोहचली नव्हती, त्या ठिकाणी भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहचलो आहोत. आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलेलं आहे.’ असं लिहित गिरीश महाजन यांनी फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये महाजन छातीभर पुराच्या पाण्यात उतरुन बचावकार्यात मदत करत असल्याचं दिसत आहे.

गिरीश महाजनांच्या सेल्फी व्हिडीओमध्ये काय?

सांगलीत बोट दुर्घटनेत जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गिरीश महाजन हे कोल्हापुरातून सांगलीकडे निघाले होते. बोट दुर्घटनास्थळी जाताना गिरीश महाजन ज्या बोटीत होते, त्या बोटीत सेल्फी व्हिडीओ शूटिंग सुरु होतं. गिरीश महाजनांचे सहकारी व्हिडीओ शूट करत होते, त्यावेळी महाजन हे हात हलवून त्यांना पोझ देत होते.

विरोधकांचं टीकास्त्र

गिरीश महाजन यांच्या या कृत्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांनी जवळचा मंत्री पाठवण्याऐवजी संवेदनशील मंत्री पाठवणं आवश्यक होतं, अशी टीका केली. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तेचा अहंकार असलेल्या सरकारची असंवेदनशीलता दिसून येते असा हल्ला चढवला.

विरोधकांच्या टीकेला व्हिडिओतून उत्तर

‘गेल्या चार दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज पोहोचलो. मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे’ असं आवाहन करत गिरीश महाजन यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.