नक्षल्यांचे जुन्या पेन्शनला समर्थन..! ‘या’ जिल्ह्यात बॅनर आढळल्याने खळबळ

बॅनर नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात यावे आणि ठेकेदारीकरण बंद करण्यात यावे, मेस्मा कायदा लागू करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा मुर्दाबाद अशा अनेक घोषणा यामध्ये लिहिलेल्या आहेत.

नक्षल्यांचे जुन्या पेन्शनला समर्थन..! 'या' जिल्ह्यात बॅनर आढळल्याने खळबळ
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 9:50 PM

गोंदिया : शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी बेमुदत आंदोलन पुकारले होते. मात्र त्यानंतर कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा होऊन हा संप मागे घेण्यात आला. त्यानंतरही काही जिल्ह्यातून हा संप चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता गोंदिया जिल्ह्यात जुन्या पेन्शन योजनेला नक्षलवाद्यांनी सर्मथन दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-सालेकसा मार्गावर बाघ नदीच्या पलिकडे ‘सीपीआय माओवादी’ या नक्षल संघटनेचे जुन्या पेन्शनला समर्थन असल्याचे बॅनर आढळून आले आहेत. या बॅनरबाजीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात जुन्या पेन्शनला घेऊन राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी वर्गाने आंदोलन करून राज्य सरकारला जेरीस आणले होते,

मात्र संघटनाच्या समन्वय समितीने संप मागे घेतल्याने जुन्या पेन्शनचा प्रश्न तसाच कायम राहिलेला असल्याची टीका काही कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.

तर आज रविवारी 26 मार्च रोजी जुन्या पेन्श च्या समर्थनात नक्षली बॅनर सापडल्याने कर्मचारी जुन्या पेशन योजनेच्या मागणीला नक्षलवाद्यांचे समर्थन असल्याचेही सामोर आले आहे. या बॅनरबाजीमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

यामधील बॅनर नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात यावे आणि ठेकेदारीकरण बंद करण्यात यावे, मेस्मा कायदा लागू करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा मुर्दाबाद अशा अनेक घोषणा यामध्ये लिहिलेल्या आहेत.

तर सोबतच काढलेले पत्रक हे महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड झोनल (माओवादी) संघटनेचा प्रवक्ता अनंत यांच्या नावे आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच हा फलक काढून टाकण्यात आला आहे.

नक्षलवाद्यांकडून अशा प्रकारची बॅनरबाजी खरच करण्यात आले आहे का त्याचा तपास आता सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून त्याची माहिती सालेकसाचे पोलीस करत असून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या संदर्भात विचारणा केली असता सदर लावण्यात आलेले फलक नक्षल्यांनीच लावले आहेत की कुणी कुरघोडी करण्याच्या उद्देशाने लावले याचाही तपास सुरू असल्याची माहिती सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.