AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse | एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते, भाजपकडून अन्याय : गुलाबराव पाटील

एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. भाजपने त्यांच्यावर अन्याय केला,असे गुलाबराव पाटील यानी म्हटले. (Gulabrao Patil comment about Eknath Khadse )

Eknath Khadse | एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते, भाजपकडून अन्याय : गुलाबराव पाटील
| Updated on: Sep 27, 2020 | 4:06 PM
Share

जळगाव- भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना डावलण्यात आले. याबाबत पत्रकारांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना विचारणा करण्यात आली. या विषयी बोलताना राष्ट्रीय कार्यकारिणी हा भाजपचा विषय आहे, त्यावर बोलणे संयुक्तिक नाही. मात्र, एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर निश्चितच भाजपने अन्याय केला आहे, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी म्हटले. (Gulabrao Patil comment about Eknath Khadse )

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी शनिवारी जाहीर झाली. (BJP working committee) भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर देखील संधी देण्यात आलेली नाही.

भाजप कार्यकारिणीत महाराष्ट्रातून कुणाला स्थान?

पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री), विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री), विजया राहटकर (राष्ट्रीय मंत्री), सुनिल देवधर (राष्ट्रीय मंत्री), व्ही. सतीश (राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री), जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा), हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता), संजू वर्मा (राष्ट्रीय प्रवक्ता) महाराष्ट्रातील  या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले.

जळगावमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अगोदर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत देखील मूग, उडीद पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. आता कापसाचे नुकसान झाल्याने शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पीक विम्यासंदर्भात पाठपुरावा सुरु

केळी पीक विम्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. त्यावर नेमलेली उपसमिती काम करत आहे. केळी उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून पीक विम्याचे निकष पूर्वीचेच राहतील, याबाबत आग्रही असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

आयसीयू रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जळगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने जळगाव शहरासाठी आयसीयू रुग्णवाहिका देण्यात आली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना कार्यालयात आयसीयू रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिकेची गरज असल्यामुळे जळगावकरांसाठी ही रुग्णवाहिका देण्यात आली.

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य

(Gulabrao Patil comment about Eknath Khadse )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.