आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. सरकार पाडण्याचा प्रयत्न नसल्याचे सांगतानाच शिवसेनेशी वैमनस्य नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ( Raosaheb Danve on Sanjay Raut and Devendra Fadnavis meeting)

आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 1:29 PM

औरंगाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राज्यात वेगळी समीकरणं आखली जात आहेत का?, अशी विचारणा होत असतानाच, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचं, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर, राजकीय मतभेद असले तरी; आमच्यात वैमनस्य नसल्याचं सांगत दानवे यांनी संदिग्धता कायम ठेवली आहे. ( Raosaheb Danve on Sanjay Raut and Devendra Fadnavis meeting)

संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकमुंबईत सांताक्रूज येथील सप्ततारांकित हॉटेल ग्रँड हयातमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (26 सप्टेंबर) बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. चर्चेचं नेमकं कारण न समजल्याने राजकीय गोटात वेगवेगळ्या चर्चा होत्या. राज्यात वेगळी राजकीय समीकरणं आखली जात आहेत का? अशीही विचारणा होत आहे. रावसाहेब दानवे यांनी याबाबत अधिकचे स्पष्टीकरण देत महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचं सांगितलं.

फडणवीस-राऊत यांच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय, “काही दिवसांपूर्वी मी संजय राऊत यांना भेटलो. त्यांनी चहाचं निमंत्रण दिल्याने त्यांच्याकडे गेलो. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातही अशीच भेट झाली. दोन पक्षांचे नेते भेटत असतात, चर्चा करत असतात. त्यामुळे अशा भेटींमधून राजकीय अर्थ काढण्यासारखं काहीही नसतं.” तसेच भाजपाची भूमिका स्पष्ट करताना, महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या प्रयत्नात नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा : अशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

पुढे बोलताना, एकमेकांच्या पायात पाय घालून महाविकास आघाडी सरकार पडलं तर भाजपाला दोष देऊ नये, असही त्यांनी म्हटलं. त्यामुळे सकारच्या स्थिरतेबद्दल सामान्यांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर, राजकीय मतभेद असले तरी आमच्यात वैमनस्य नसल्याचं सांगत दानवे यांनी संदिग्धता कायम ठेवली. त्यामुळे भाजप आणि शिवसेना आगामी काळात एकत्र येणार का?, असा सवाल विचारला जात आहे.

संबंधित बातम्या :

संजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर

संजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट

सेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात : सुधीर मुनगंटीवार

( Raosaheb Danve on Sanjay Raut and Devendra Fadnavis meeting)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.