AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harsh Limbachiyaa Arrest | कॉमेडियन भारती सिंहपाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक, NCB कडून तब्बल 17 तास चौकशी

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला अटक करण्यात आली आहे. (Bharti Singh And Harsh Limbachiyaa Arrested In Drug Case)

Harsh Limbachiyaa Arrest | कॉमेडियन भारती सिंहपाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक, NCB कडून तब्बल 17 तास चौकशी
| Updated on: Nov 22, 2020 | 9:18 AM
Share

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला अटक करण्यात आली आहे. तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्षला अटक करण्यात आली आहे. भारती आणि हर्षच्या घरात 86 ग्रॅम गांजा सापडला होता. त्यानंतर कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला (Harsh Limbachiyaa) एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास  भारतीला अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता हर्षलाही अटक करण्यात आली आहे. (Bharti Singh And Harsh Limbachiyaa Arrested In Drug Case)

या दोघांच्या अटकेनंतर आज त्यांना हाॅलिडे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल हर्ष आणि भारतीला NCB ने  समन्स बजावले होते. त्यानंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतलं.

मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे. तर तिच्या पतीची म्हणजे हर्षची चौकशी सुरु होती. या चौकशीत ते दोघेही गांजाचे सेवन करत असल्याचे उघड झालं आहे. तब्बल 17 तास तिची चौकशी केल्यावर हर्षला अटक करण्यात आली आहे.

(Bharti Singh And Harsh Limbachiyaa Arrested In Drug Case)

नेमकं काय घडलं? 

एनसीबीने काल  खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग हिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. तर, हर्षची चौकशी सुरु होती. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे.

गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीने हर्ष-भारतीच्या घरावर छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. (Bharti Singh And Harsh Limbachiyaa Arrested In Drug Case)

संबँधित बातम्या :

Drugs Case | गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?