महिलांच्या ‘लव्हली’ व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पुरुष घुसला आणि…
नाशिकमध्ये सामाजिक काम करणाऱ्या महिलांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. 'लव्हली हायटेक ग्रुप' असे या महिलांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव आहे.

नाशिक : व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर किती वाढला आहे, हे आता वेगळं सांगायला नको. रोजच्या आयुष्यात पावलो-पावली व्हॉट्सअॅपचा वापर होताना दिसतो. अनेक गोष्टी तर आता व्हॉट्सअॅपवरच अवलंबून असतात. काहीजण सकारात्मक संदेश पाठवण्यासाठी करतात, तर काहीजण कामानिमित्त वापर करतात. नाशिकमधील महिलांचाही व्हॉट्सअॅपवर असाच एक ग्रुप आहे. मात्र, त्यांच्या ग्रुपमध्ये अचानक हॅकर घुसल्याने एकच गोंधळ उडाला.
नाशिकमध्ये सामाजिक काम करणाऱ्या महिलांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. ‘लव्हली हायटेक ग्रुप’ असे या महिलांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव आहे. या ग्रुपच्या माध्यमातून महिला सामाजिक कामं करत असतात. सकारात्मक कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या या ग्रुपमध्ये हॅकर घुसल्याने मोठा गोंधळ झाला.
महिलांच्या ‘लव्हली हायटेक ग्रुप’मध्ये विकृत हॅकर्स घुसला आणि त्याने ग्रुपमध्ये त्याचा वैयक्तिक क्रमांक पोस्ट केला. त्यानंतर अश्लील मेसेजही पोस्ट करु लागला. त्यामुळे अर्थात, ग्रुपमधील सर्वच महिला गोंधळल्या आणि घाबरल्या.
त्यात, ‘मी पाकिस्तानमधून एसएमएस करत आहे’ असाही मेसेज हॅकरने ग्रुपमध्ये टाकला. त्यामुळे ग्रुपमधील सर्वच महिला घाबरल्या. त्यानंतर या महिलांनी यासंबंधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
