… आणि पवारांबद्दल बोलताना मुश्रीफांना अश्रू अनावर का?

राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार आज 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (hasan mushrif speaking on sharad pawar as a leader)

... आणि पवारांबद्दल बोलताना मुश्रीफांना अश्रू अनावर का?

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार आज 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. पण पवारांवर बोलताना मुश्रीफ थोडावेळ थबकले. गहिवरले… भावूक झालेल्या मुश्रीफांना यावेळी अश्रू अनावर झाले. (hasan mushrif speaking on sharad pawar as a leader)

हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना व्हर्च्युअल पद्धतीने आज शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या. मिरज दंगलीनंतर मुश्रीफ निवडून आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करताच मुश्रीफ गहिवरून गेले. त्यांना अश्रू रोखणे अवघड झाले.

पवारांना व्हर्च्युअल पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी ते कोल्हापुरातून सहभागी झाले होते. शरद पवार यांच्या विषयी बोलताना मंत्री मुश्रीफ यांना स्टेजवरच अश्रू अनावर झाले. शरद पवार यांनी राजकारणात दिलेली संधी, केलेलं मार्गदर्शन या विषयाचे अनेक किस्से यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एक किस्साही आवर्जून सांगितला, तो होता 2009 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतरचा. 2009 च्या विधानसभा निवडणुकीआधी सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गणेशोत्सवादरम्यान जातीय दंगल झाली. त्याचा परिणाम म्हणून त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. मात्र याही परिस्थितीत मुश्रीफ कागलमधून विक्रमी मतांनी निवडून आले होते.. या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझा कार्यकर्ता निवडून आला याचा मनस्वी आनंद असल्याचा उल्लेख केला होता. या उल्लेखा विषयाचा अनुभव सांगताना मंत्री मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सरपंचाची निवड सदस्यांतूनच

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना हसन मुश्रीफ यांनी सरपंचाची निवड सदस्यांतूनच होणार असल्याचं स्पष्ट केलं. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. डिसेंबर अखेर 14 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. आता कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे, असं मुश्रीफ म्हणाले. भाजप काळातील लोकनियुक्त सरपंच निवडला जात होता. ही पद्धत चुकीची आणि लोकशाही विरोधी होती. निवडच करायची तर मग पंतप्रधानांपासून ते सरपंचापर्यंत सर्वांचीच नियुक्त लोकांमधून व्हावी. एकट्या सरपंचाची कशाला? असा सवाल करतानाच फक्त ग्रामपंचायत आणि नगरपालिकेत हा प्रयोग राबवण्यात अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. आधी निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचं आरक्षण जाहीर व्हायचं. आता निवडणुकीच्या निकालानंतर सरपंचपदाचं आरक्षण काढलं जाणार आहे आणि त्या त्या प्रवर्गातील व्यक्तीला सरपंच केलं जाणार असल्याचंही ते म्हणाले.(hasan mushrif speaking on sharad pawar as a leader)

 

संबंधित बातम्या:

सरपंचाची निवड सदस्यांतूनच, गोंधळ नको: हसन मुश्रीफ

ठाकरे सरकारचं पुन्हा धक्कातंत्र, थेट नगराध्यक्ष-सरपंच निवडणूक रद्द होणार

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

(hasan mushrif speaking on sharad pawar as a leader)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI