105 आमदारांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी दम दाखवून दिला; हसन मुश्रीफ यांचा घणाघात

'तुमच्यात सरकार चालवण्याचा दम नाही. म्हणूनच तुम्ही रडत बसत बसले असून तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत करणार?,' विरोधकांनी केलेल्या या टीकेचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला आहे.

105 आमदारांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी दम दाखवून दिला; हसन मुश्रीफ यांचा घणाघात

कोल्हापूर: ‘तुमच्यात सरकार चालवण्याचा दम नाही. म्हणूनच तुम्ही रडत बसत बसले असून तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत करणार?,’ विरोधकांनी केलेल्या या टीकेचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला आहे. भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात काय दम आहे हे दाखवून दिलं आहे, असं टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. (hasan mushrif taunts bjp over criticized uddhav thackeray)

हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. भाजपच्या 105 आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसवले. त्यांनी त्यांचा दम दाखवून दिला, असं सांगतानाच कोरोना संकट आणि नैसर्गिक संकटावर मुख्यमंत्र्यानी ज्या पद्धतीने मात दिलीय. ते दम असल्याशिवाय नाही, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला. सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अस्वस्थ जाले आहेत. त्यामुळे ते रोज टीका करत आहेत. त्यांनी थोडा संयम ठेवला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

काय म्हणाले होते दरेकर?

“माझं कुटुंब, माझी जबाबदारी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. पण आता फक्त भावनिक आवाहन करुन चालणार नाही. काम करायला हवं. सरकार चालवण्याचा जर दम नसेल, तुम्ही रडत बसणार तर मग शेतकऱ्याला काय मदत करणार?”, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता.

“सत्ताधारी फक्त महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काम करत आहेत. राजकारण भोवतीच हे फिरतात. डोळ्याने शेती उद्ध्वस्त झालेली दिसते आहे. त्यांनी फोटोच्याआधारे सरसकट मदत करावी”, असं दरेकर म्हणाले होते.

“राज्य सरकार केंद्राने मदत करावी म्हणत केंद्राकडे बोट दाखवत आहे. नाचता येई ना आंगन वाकडे, अशी गोष्ट आहे. पण केंद्राकडे बोट दाखवत स्वतःची जबाबदारी टाळता येणार नाही. वाद निर्माण करायचा आणि मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं, अशी या सरकारच्या कामाची पद्धत आहे”, अशी टीकाही त्यांनी केली होती. (hasan mushrif taunts bjp over criticized uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

तुमच्यात सरकार चालवण्याचा दम नसेल, तुम्ही रडत बसणार तर शेतकऱ्याला काय मदत करणार? : प्रवीण दरेकर

ठाकरे सरकार म्हणजे बदमाशांचं सरकार, आशिष शेलारांचा हल्लाबोल

(hasan mushrif taunts bjp over criticized uddhav thackeray)

Published On - 8:11 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI