AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi | हीना पांचाळ ‘बिग बॉस’च्या घरातून बाद

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वातून अभिनेत्री हीना पांचाळ हिचा प्रवास संपलेला आहे. शिव ठाकरेपेक्षा कमी मतं मिळाल्यामुळे हीनाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला

Bigg Boss Marathi | हीना पांचाळ 'बिग बॉस'च्या घरातून बाद
| Updated on: Aug 18, 2019 | 11:41 AM
Share

Bigg Boss Marathi मुंबई : अभिनेत्री मलायका अरोराची लूक-अलाईक अशी ख्याती मिळवलेली ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील डान्सर हीना पांचाळ (Heena Panchal) हिला निरोप देण्यात आला आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक असलेल्या हीनाचा प्रवास महाअंतिम फेरीच्या अवघ्या दोन आठवडे आधी संपला.

गेल्या आठवड्यात हीना आणि शिव ठाकरे हे दोनच स्पर्धक नॉमिनेट झाले होते. शिवचं फॅन फॉलोईंग पाहता हीनाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागेल, अशी अटकळ बांधली जात होती. रविवारच्या भागामध्ये हीनाचं एलिमिनेशन पाहायला मिळेल. या भागात राशिचक्रकार शरद उपाध्ये हजेरी लावणार आहेत. स्पर्धकांच्या राशीनुसार त्यांचे स्वभाववैशिष्ट्य उपाध्ये सांगतील.

गेल्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये आक्रमक वागल्याची शिक्षा म्हणून ‘बिग बॉस’नी शिवला थेट नॉमिनेट केले होते. टास्क स्थगित झाल्यामुळे किशोरी शहाणे-वीज यांच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडली. त्यामुळे त्या नॉमिनेशन प्रक्रियेपासून सुरक्षित झाल्या होत्या. मेडल टास्कमध्ये कमी मतं मिळाल्यामुळे हीना ही एकमेव स्पर्धक नॉमिनेट झाली होती.

बिचुकलेंची पुन्हा शाळा

शनिवारच्या भागात महेश मांजरेकर यांनी अभिजीत बिचुकलेंची पुन्हा शाळा घेतली. वीणाला ‘तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही’ असं म्हटल्याबद्दल मांजरेकरांनी बिचुकलेंना फैलावर घेतलं. त्याशिवाय आक्रमक खेळ आणि वीणासोबत वाढती लगट यावरुन महेश मांजरेकरांनी शिव ठाकरेचेही कान टोचले. याशिवाय किशोरी शहाणे, वीणा जगताप यांनाही महेश मांजरेकरांनी खडे बोल सुनावले.

दर आठवड्याला महेश मांजरेकर हीनाला कमी बोलण्याचा सल्ला देतात. यावेळी हा सल्ला अंमलात आणल्याबद्दल मांजरेकरांनी हीनाचं कौतुकही केलं.

बिग बॉस आधी हीना पांचाळची ओळख काय होती?

हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत ती अनेक ‘आयटम साँग्स’मध्ये झळकली आहे.

हीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआउट करतानाचे व्हिडिओ अपलोड केले होते. हीनाचे अनेक टीकटॉक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

विजेतेपदाच्या शर्यतीत असलेला अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) गेल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाद झाला. यापूर्वी वैशाली म्हाडे, माधव देवचके, रुपाली भोसले यांनी घराचा निरोप घेतला होता.

‘बिग बॉस’च्या घरात उरलेल्या स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी गाठण्यासाठी चढाओढ सुरु आहे. आता वीणा जगताप, शिव ठाकरे, किशोरी शहाणे-वीज, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले आणि आरोह वेलणकर हे सात सदस्य आता खेळात राहिले आहेत. यापैकी बिचुकलेंना सदस्यत्वाचा दर्जा अद्याप देण्यात आलेला नाही.

Bigg Boss Marathi | अभिजीत केळकर ‘बिग बॉस’च्या घराबाहेर

Bigg Boss Marathi | रुपाली भोसले ‘बिग बॉस’च्या घरातून Eliminate

Bigg Boss Marathi 2 | वीणाने पापण्यांवर कोरलं शिवचं नाव!

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.