पुण्यातील विळखा आणखी घट्ट, 90 नव्या कोरोना रुग्णांची भर, एकूण आकडा हजार पार

पुणे आणि पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आणि मृतांचा आलेखही वाढताच आहे (High increase in Corona Patient in Pune).

पुण्यातील विळखा आणखी घट्ट, 90 नव्या कोरोना रुग्णांची भर, एकूण आकडा हजार पार

पुणे : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पुणे आणि पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आणि मृतांचा आलेखही वाढताच आहे (High increase in Corona Patient in Pune). पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात आज (25 एप्रिल) नव्या 90 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यासह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची 1 हजार 184 इतकी झाली आहे. आज दिवसभरात कोरोना संसर्ग झालेल्या 5 रुग्णांचा मृत्यू झाला. आता एकूण मृतांचा आकडा 72 वर पोहचला आहे.

पुणे आणि पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांचा आणि रुग्णांचा वाढता आलेख कायम आहे. शनिवारी (25 एप्रिल) जिल्ह्यात 90 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झालीय. गेल्या 3 दिवसांपासून पुण्यातील रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमालीचा वाढतोय. 3 दिवसात तब्बल 298 नवीन रुग्णांची भर पडली आहे, तर 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या काळजीत भर पडली आहे. दुसरीकडे उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. आज (25 एप्रिल) 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत 169 कोरोनामुक्त रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. आता पुण्यात एकूण 842 कोरोना सक्रिय रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील 45 रुग्ण अत्यवस्थ आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. पुणे जिल्ह्याचा विचार करता आज एकूण 29 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 182 झाली आहे.

पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक

पुण्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात तब्बल दीड महिन्यानंतर ही सर्वाधिक आहे. 24 एप्रिलपर्यंत पुण्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक होता. पुण्याचा कोरोना मृत्यूदर 6.5 टक्के इतका आहे. तर, देशाचा कोरोना मृत्यूदर 3.2 टक्के आणि महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर 4.8 टक्के इतका आहे. म्हणजेच देशाच्या मृत्यूदरापेक्षा दुप्पट मृत्यूदर पुण्याचा आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, अतिरिक्त निर्बंध, डोअर टू डोअर स्क्रिनिंग, पोलीस कारवाया, केंद्रीय पथकाची पाहणी आणि त्यानंतर वेगवेगळे उपायोजना राबवल्या जात आहेत. मात्र, तरीही पुण्याचा कोरोना मृत्यूदर कमी होत नसल्याने प्रशासनाची चिंता (Pune Corona Death Update) वाढली आहे.

पुणे पोलिसांकडून बेशिस्त पुणेकरांवर कारवाईचा बडगा

पुण्यात कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचा आणि रुग्णांचा आकडा वाढतोय. मात्र काही पुणेकरांना याच सोयरसुतक नसल्याचं पाहायला मिळतंय. अतिरिक्त निर्बंध हटवल्यानंतर मोकाट फिरणारे सुसाट सुटलेत. अशा मोकाटांवर दोन दिवसात तब्बल 4 हजार 399 कारवाया करण्यात आल्यात. या कारवायांवरुन काही पुणेकर कोरोना विरुद्धच्या लढाईत आडकाठी आणत असल्याचं दिसतंय.

शनिवारी तब्बल दोन हजार 305 कारवाया करण्यात आल्या. तर शुक्रवारी 2 हजार 94 कारवाया झाल्यात. दोन दिवसात कलम 188 अंतर्गत 899 गुन्हे दाखल झालेत. तर 1414 वाहने जप्त करुन 1883 जणांना नोटीस बजावली आहे. तर मास्क न वापरणार्‍या 77 आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्या 126 जणांवर कारवाई केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा, जिल्हा प्रशासन काटेकोर नियोजन करत आहे. मात्र अशा उपद्रवी व्यक्तीमुळे त्या प्रयत्नांवर पाणी फेरलं जातंय. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू लागलाय.

संबंधित बातम्या :

कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात तब्बल 811 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 7,628 वर

कोरोना चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, 40 प्रयोगशाळांच्या मदतीने 1 लाखाचा टप्पा पार

पुण्यातील खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेल ताब्यात घ्या, अजित पवारांचे आदेश

Pune Corona : पुण्यात कोरोनाचं मृत्यूचक्र सुरुच, 24 तासात दोघांचा मृत्यू, आकडा 66 वर

High increase in Corona Patient in Pune

Published On - 11:59 pm, Sat, 25 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI