सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; घर खरेदीची ई-नोंदणी आता बिल्डरच्या कार्यालयातच होणार

हुतांश नोंदणी उपनिबंधकांच्या कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. मात्र नागरिकांना नोंदणीसाठी तिथेच फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळं चांगलया सुविधा मिळाव्यात . सोयीचा आभाव आलेल्या कार्यालयातच नारिकांना यावे लागू नये,  यासाठी ही सुविधा निर्माणात करण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; घर खरेदीची ई-नोंदणी आता बिल्डरच्या कार्यालयातच होणार
संग्रहित छायाचित्र.

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदी केल्यानंतर सदनिकेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी नोंदणी उपनिबंधकांच्या कार्यालयात घालावे लागणारे खेटे आता थांबणार आहेत . सदनिकेच्या खरेदीनंतर आता बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातच विक्री नोंदणी प्रक्रिया (रजिस्ट्रेशन) पूर्ण केली जाणार आहे. आगामी दोन – तीन महिन्यात बांधाकाम व्यवसायिकांना घर खरेदीची ई-नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याबाबतचे आदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी नोंदणी महानिरीक्षकांसह सर्व संबंधितांना दिले आहेत.

अशी असेल ई- नोंदणी पद्धत

  • ई- रजिस्ट्रेशन अंतर्गत, ʻरेराʼ मान्य आणि प्रथम विक्री व्यवहारासाठी (फर्स्ट सेल) हा निर्णय लागू असेल.
  • या प्रक्रियेत, बिल्डरच्या कागदपत्रांना तसेच व्हॅल्युएशनला विभागाचे सहनिबंधक हे मंजुरी देतील.
  • त्यानंतर नॅशनल इन्फोरमॅटिक्स सेंटर (एनआयसी) यांनी विकसित केलेल्या प्रणालीद्वारे डेव्हलपरच्या कार्यालयात अथवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडली जाईल.
  • त्यासाठी विभागातर्फे ई – रजिस्ट्रारची नियुक्ती केली जाईल.

राज्यातील बहुतांश नोंदणी उपनिबंधकांच्या कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. मात्र नागरिकांना नोंदणीसाठी तिथेच फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळं चांगलया सुविधा मिळाव्यात . सोयीचा आभाव आलेल्या कार्यालयातच नारिकांना यावे लागू नये,  यासाठी ही सुविधा निर्माणात करण्यात येणार आहे.

नागरिकांना कार्यालयात न येता सोयीनुसार रजिस्ट्रेशन करता यावे, असा उद्देश आहे.  या प्रक्रियेत काही अडचणी येत आहेत. प्रथम त्या दूर करण्यावर आमचा भर आहे.   – डॉ. नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य.

Eye Care : डोळ्यांचा थकवा आणि ताण कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

IND vs NZ, Live, 1st Test, Day 5 : लॅथम-सोमरविलेची अर्धशतकी भागीदारी, भारत विकेटच्या शोधात

घरात पैशांची कमतरता आहे , मग वास्तू दोष वेळीच काढा, जाणून घ्या उपाय

Published On - 10:53 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI