Honda Activa ला भारतीयांची सर्वाधिक पसंती, 20 वर्षात तब्बल 2.5 कोटी ग्राहक जोडले

होंडा अ‍ॅक्टिव्हाने (Honda Activa) गेल्या 20 वर्षांमध्ये 2.5 कोटी ग्राहक जोडले आहेत.

Honda Activa ला भारतीयांची सर्वाधिक पसंती, 20 वर्षात तब्बल 2.5 कोटी ग्राहक जोडले
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 2:58 PM

मुंबई : होंडा अ‍ॅक्टिव्हाने (Honda Activa) गेल्या 20 वर्षांमध्ये 2.5 कोटी ग्राहक जोडले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री करुन Honda Activa ने भारतीय टू व्हिलर इंडस्ट्रीमध्ये इतिहास घडवला आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा 2001 साली लाँच करण्यात आली होती. सुरुवातीच्या तीन वर्षांमध्ये 102 सीसी इंजिन असलेली होंडा अ‍ॅक्टिव्हा त्यावेळी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर ठरली होती. पुढील दोन वर्षांमध्ये या स्कूटरने 10 लाखांच्या विक्रीचा टप्पा पार केला. (Honda Activa became first choice of people 25 million customers in 20 years)

2004 नंतर कंपनीने 100-110 सीसी इंजिनासह नवीन अधिक पॉवरफुल्ल 125 सीसी इंजिन असलेली अ‍ॅक्टिव्हा लाँच केली. या स्कूटरला पूर्वीपेक्षा अधिक पसंती मिळाली. आता 20 वर्षांनंतर अ‍ॅक्टिव्हा लेटेस्ट टेक्नोलॉजीच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. अ‍ॅक्टिव्हा हा ब्रँड तिन्ही पिढ्यांमधील लोकांच्या पसंतीस उतरला आहे. 20 वर्षांनंतरही अ‍ॅक्टिव्हा ही भारतीयांची आवडती स्कूटर आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा 2008 मध्ये 110 सीसीच्या मोठ्या इंजिनासह अपग्रे़ड करण्यात आली होती. होंडा कंपनी नवनवीन तंत्रज्ञान आणि सुविधांसह अ‍ॅक्टिव्हा अपग्रेड करत गेली. त्यामुळे ही स्कूटर लोकांच्या मनातून कधी उतरलीच नाही.

2015 पर्यंत 15 वर्षांमध्ये या स्कूटरच्या एक कोटी युनिट्सची विक्री झाली होती. याचदरम्यान कंपनीने 125 सीसी इंजिन असलेली होंडा अ‍ॅक्टिव्हा लाँच केली. त्यानंतर गेल्या पाच वर्षांमध्ये भारतात 1.5 कोटी ग्राहक जोडले. म्हणजेच गेल्या 20 वर्षांत अ‍ॅक्टिव्हाने 2.5 ग्राहक जोडले आहेत. त्यामुळेच अ‍ॅक्टिव्हा आता केवळ भारतात सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड राहिलेला नसून संपूर्ण जगभऱात सर्वाधिकल विक्री होणारा ब्रँड आहे.

दरम्यान होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने त्यांची जबरदस्त स्कूटर Honda Activa ला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतात Honda Activa 20th Anniversary Edition लाँच केली आहे. होंडा अॅक्टिव्हाच्या या खास एडिशनला भारतात 66 हजार 816 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. होंडाने अॅक्टिव्हाच्या स्टँडर्ड आणि DLX अशा दोन्ही व्हेरियंटचे अॅनिव्हर्सरी एडिशन लाँच केले आहे. होंडा अॅक्टिव्हा अॅनिव्हर्सरीच्या DLX व्हेरियंटला भारतात 68 हजार 316 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे.

देशभरात लाँचिंगसोबतच Honda Activa Anniversary Edition ची विक्री सुरू करण्यात आली आहे. या एडिशनला रेग्युलर अॅक्टिव्हापेक्षा 1500 रुपयांच्या अधिक किंमतीत लाँच केले आहे. गेल्या 20 वर्षात होंडा अॅक्टिव्हाच्या सहा जनरेशन मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. मंथली सेलमध्ये या स्कूटरने हिरो स्प्लेंडरचा विक्रमही मोडीत काढला आहे. आता ही स्कुटी हिरो स्प्लेंडर बाईकनंतर देशात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटी आहे.

हेही वाचा

Royal Enfield Meteor 350 चा जलवा, एका महिन्यात बंपर विक्री, बुलेटलाही मागे टाकले

होंडा कंपनी करणार कर्मचाऱ्यांना रिटायर; भारतातील पर्मनंट कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका

महिंद्रा देशातील सर्वात स्वस्त Electric vehicle सादर करणार, कार लाँचिंगसाठी सज्ज

लाडकी Tata Safari परत येतेय, लवकरच प्री-बुकिंगला सुरुवात होणार

(Honda Activa became first choice of people 25 million customers in 20 years)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.