AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका, NDRF ची टीम तैनात, ठाणे-पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यातील कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाची जोरदार शक्यता आहे. मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल (Hurricane prediction by IMD in Kokan region).

कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका, NDRF ची टीम तैनात, ठाणे-पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
| Updated on: Jun 01, 2020 | 9:21 PM
Share

मुंबई : राज्यातील कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाची जोरदार शक्यता आहे. मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल (Hurricane prediction by IMD in Kokan region). याचा मोठा फटका पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी बसेल. कोकणात जोरदार पाऊसही होईल. संपूर्ण राज्यात 4 जूनपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यभरात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. पालघर आणि दमनला वादळाचा जोरदार फटका बसेल, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

हवामान विभागाचे म्हटलं आहे, ” पूर्वेकडील आणि त्याजवळील नैऋत्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र मागील 6 तासात 13 किलोमीटर प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. पुढील 6 तासात हे क्षेत्र पूर्वपश्चिम आणि जवळच्या नैऋत्य अरबी समुद्रावर तीव्र होईल. त्यानंतरच्या 24 तासात पूर्वपश्चिम अरबी समुद्रावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. 2 जूनला पहाटे ते उत्तरेकडे सरकेल, नंतर उत्तर-इशान्येकडे वळेल. 3 जूनच्या दुपारी उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात ओलांडून हरिहरेश्वर (रायगड, महाराष्ट्र) आणि दमन दरम्यान हे क्रॉस होण्याची शक्यता आहे.”

मच्छिमारांसाठी इशारा

मच्छिमारांना 2 जूनपर्यंत दक्षिणपूर्व अरबी समुद्र, लक्षद्वीप क्षेत्रात आणि केरळ किनारपट्टीवर आणि पुढे जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. 3 जूनपर्यंत पूर्व मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटक किनारपट्टीपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 4 जूनच्या दरम्यान महाराष्ट्र किनारपट्टीच्या पूर्वेकडील अरबी समुद्री किनारपट्टी व इशान्य अरबी समुद्र व गुजरात किनारपट्टी येथे जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे म्हणाले, “अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून यामुळे येत्या काही दिवसात पश्चिम किनारपट्टीला चक्री वादळाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि विशेषतः मच्छीमारांनी सतर्क राहवे. वसई, पालघर, डहाणू या 3 तालुक्यातील किनारपट्टीवरील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पक्क्या घरात किंवा शाळेत आसरा घ्यावा. जिल्ह्यातील 577 मासेमारी बोटी समुद्रात गेल्या आहेत. त्यापैकी 477 बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा आल्या आहेत. अजूनही 100 बोटी समुद्रात आहेत. त्यांना समुद्रकिनारी येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालघर आणि डहाणूमध्ये 2 एनडीआरएफच्या टीमही तैनात झाल्या आहेत.”

संबंधित बातम्या :

बळीराजाला दिलासा, यंदा चांगले पर्जन्यमान, जून ते सप्टेंबर सरासरीच्या 102% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

सातारा कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, कुठे गारांचा वर्षाव, तर कुठे वादळाने झाडांची पडझड

महापुराचा धसका, कोल्हापुरात धरणांमधून 4 हजार क्सूसेक पाण्याचा विसर्ग

Hurricane prediction by IMD in Kokan region

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.