Hyundai All New i20 साठी बुकिंग सुरु, ‘या’ दिवशी कार लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Hyundai India च्या प्रिमियम हॅचबॅक ‘ऑल-न्यू’ आय 20 या कारसाठी बुकिंगला आजपासून सुरुवात झाली आहे.

Hyundai All New i20 साठी बुकिंग सुरु, 'या' दिवशी कार लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 2:37 PM

मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Hyundai India च्या प्रिमियम हॅचबॅक ‘ऑल-न्यू’ आय 20 (all new i20) या कारसाठी बुकिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. 21 हजार रुपये टोकन अमाऊंट भरून तुम्ही ही कार बुक करु शकता. Hyundai कंपनी All New i20 कार 5 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. (Hyundai All New i20 bookings open from today, Car will launch on 5th november)

Click To Buy प्लॅटफॉर्मद्वारे नवीन i20 कार बुक करणाऱ्या HDFC आणि ICICI च्या ग्राहकांना बुकिंग अमाऊंटवर 10 टक्के कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचे एमडी आणि सीईओ एस. एस. किम म्हणाले की, i20 हा ह्युंदाईसाठी सुपर परफॉर्मर ब्रँड ठरला आहे. ही कार गेल्या एक दशकापासून आधुनिक भारतीय ग्राहकांच्या पसंतील उतरत आहे. ऑल न्यू आय 20 प्रिमियम कारने हॅचबॅक सेगमेंटमध्ये शानदार स्टाईल आणि नव्या उत्कृष्ट तंत्रज्ञानामुळे एक बेन्चमार्क सेट करुन ठेवला आहे.

ही कार पेट्रोल, डिझेल, टर्बो पेट्रोल बीएस-6 इंजिन आणि ट्रान्समिशनसह उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये फर्स्ट इन-सेगमेंट इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन (आईएमटी), इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (आईवीटी), 7-स्पीड ड्यूल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) आणि मॅन्युअल व्हेरिएंटचा समावेश आहे.

नवीन i20 मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. जे 83hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करतं. या इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल किंवा CVT गियरबॉक्सचा पर्याय असेल. डिझेल इंजिन 1.5 लीटर टर्बो यूनिट आहे जे 100hp पॉवर आणि 240Nm टॉर्क निर्माण करतं. डिझेल इंजिनासह 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असेल. या कारचे इंजिन Venue, Creta, 2020 Verna आणि Seltos मध्ये वापरले आहे.

नवीन i20 च्या फ्रंट लूकमध्ये पाहिले तर, फ्रंटमध्ये मोठे ग्रिल, शार्प हेडलॅम्प आणि सिग्नेचर एलईडी डीआरएल दिले आहेत. रुफलाईन आणि शार्प स्टाईलचा सी-पिलरमुळे कारचा लूक अप्रतिम वाटतो. तर नवीन i20 च्या मागच्या बाजूला रॅपअराऊंड एलईडी टेललाईट आहे.

सबंधित बातमी

Mahindra Thar 2020 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

सणासुदीच्या दिवसांमध्ये Hero Super Splendor घरी आणा, कंपनीकडून तीन मोठ्या ऑफर्स

ठरलं! रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित Meteor 350 लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

आत्मनिर्भर भारत! मर्सिडीजच्या कार महाराष्ट्रात असेंबल होणार

(Hyundai All New i20 bookings open from today, Car will launch on 5th november)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.