Hyundai Aura बुक करा केवळ 10 हजारात

Hyundai इंडियाने कॉम्पॅक्ट सेडान 'ऑरा (Aura)' ची बुकिंग सुरु केली आहे. या गाडीला तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये बुक करु शकता.

Hyundai Aura बुक करा केवळ 10 हजारात

मुंबई : नवीन वर्षात जर तुम्ही नवी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Hyundai इंडियाने कॉम्पॅक्ट सेडान ‘ऑरा (Aura)’ ची बुकिंग सुरु केली आहे (Hyundai Aura Compact Sedan). या गाडीला तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये बुक करु शकता.

Hyundai कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार, ऑरा ची बुकिंग कंपनीच्या वेबसाइटवर किंवा तिच्या डीलरशिपच्या माध्यमातून केली जाऊ शकते. कंपनी ऑराची बुकिंग सुरु करत नव्या दशकाची सुरुवात करत आहे, असं कंपनीचे संचालक तरुण गर्ग यांनी सांगितलं.

“आम्हाला विश्वास आहे की ऑरा या कॉम्पॅक्ट सेडान प्रकारात आपलं स्थान निश्चित करेल”, या गाडीला बाजारात 21 जानेवारीला लाँच केलं जाईल. गेल्या 19 डिसेंबरला कंपनीने या गाडीला पहिल्यांदा प्रदर्शित केलं होतं. ऑराची किंमत 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत असेल.

ऑराचे फीचर्स

Hyundai Aura ला Grand i10 Nios च्या प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आलं आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझल दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. ऑराच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसोबतच 8-इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेन्ट सिस्टम, 5.3-इंचाचा डिजीटल स्पीडोमीटर आणि एमआईडी, वायरलेस चार्जर आणि प्रीमियम साउंड सिस्टम देण्यात येत आहे. तर रिअर सेंटर आर्मरेस्टसारखे फीचर्सही यामध्ये आहेत. भारतीय बाजारात Hyundai च्या या सेडानची टक्कर मारुती डिझायर, होंडा अमेज, टाटा टिगोर आणि रेनॉच्या येणाऱ्या सब-कॉम्पॅक्ट सेडानशी असेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI