मी सुखरुप आहे, पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा दुसरा व्हिडीओ जारी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केला. पण काही वेळातच दोन नसून एकच पायलट आमच्याकडे असल्याचा […]

मी सुखरुप आहे, पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा दुसरा व्हिडीओ जारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केला. पण काही वेळातच दोन नसून एकच पायलट आमच्याकडे असल्याचा यू टर्न पाकिस्तानने घेतला. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा दुसरा व्हिडीओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आलाय. यामध्ये ते चहा पित असून मी सुखरुप असल्याचं सांगत आहेत. अभिनंदन यांच्याविषयी संपूर्ण देशाला चिंता वाटत आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, पाकिस्तानकडून अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लावला जाऊ शकत नाही. पण पाकिस्तानवर विश्वास ठेवणं कठीण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ पाहा :

युद्धबंदीसाठी काय आहे नियम?

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नियम पाळत असेल तर अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लावता येणार नाही. कारण, युद्धबंदींसाठी खास करार आहे. जिनेव्हा करार असं याचं नाव आहे. या करारानुसार युद्धबंदींना भीती दाखवली जाऊ शकत नाही, किंवा त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही. युद्धबंदींचा वापर करुन जनतेमध्ये उत्सुकता करण्यासाठीही बंदी आहे.

जिनेव्हा करारानुसार, एकतर युद्धबंदीवर खटला चालवला जाऊ शकतो, किंवा संबंधित देशाकडे त्या युद्धबंदीचं हस्तांतरण करावं लागेल. युद्धबंदी पकडल्यानंतर नाव, सैन्यातील पद आणि नंबर सांगण्याची तरतूद आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला अभिनंदन यांना एका सैनिकासारखीच वागणूक द्यावी लागेल.

दरम्यान, जिनेव्हा कराराचं उल्लंघन अनेक देशांनी केलेलं आहे. मानवी मूल्य जोपासण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.