AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs AFG | अफगाणिस्तान संघाचं इंग्लंडला इतक्या धावांचं आव्हान, वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास

ENG vs AFG | वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरूद्धचा सामनास सूरू आहे. इग्लंड संघाविरूद्ध अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी करत जवळपास तीनशेजवळ धावसंख्या पोहोचवली. इंग्लंड दुसऱ्या विजयासाठी उत्सुक आहे.

ENG vs AFG | अफगाणिस्तान संघाचं इंग्लंडला इतक्या धावांचं आव्हान, वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास
| Updated on: Oct 15, 2023 | 6:56 PM
Share

दिल्ली | वर्ल्ड कप 2023 मधील 13 वा सामना अफगाणिस्तान आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाचा डाव 284 धावांवर गुंडाळला गेला. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाज याने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. त्यासोबतच इक्रम अलीखिल यानेही शेवटला डावाची सूत्रे आपल्या हातात घेत 58 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. तर इंग्लंड संघांकडून आदिल रशिद याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

अफगाणिस्तानने रचला इतिहास

वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघाने आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी खेळी केली आहे. याआधी 288 धावांची वेस्ट इंडिज संघाविरूद्ध २०१९ साली मोठी धावसंख्या रचली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये इग्लंड संघाविरूद्ध 284 धावा केल्या आहेत. त्याआधी झालेल्या भारताविरूद्धच्या सामन्यातही 272 धावा करत मोठा विक्रम रचला  होता. मात्र भारताने त्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात अफगाणिस्तानचे गोलंदाज इंग्लंडला  रोखण्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंड संघानेही एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये एकूण ४९.५ ओव्हर टाकल्या यामधील २४ ओव्हर इंग्लंडच्या स्पिनर्सने टाकल्या. वर्ल्ड कपमध्ये एक सामन्यामध्ये इंग्लंडच्या स्पिनर्सने टाकलेल्या दुसऱ्या सर्वाधिक ओव्हर टाकल्या.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.