ट्रेनमध्ये पाणी नसेल तर तुम्ही करु शकता तक्रार, मिळेल नुकसान भरपाई
जर तुम्हाला ट्रेनच्या प्रवासात अशा अडचणींचा सामना करावा लागला तर तुम्ही देखील रेल्वेच्या कार्यालयाकडे तक्रार करु शकता.तु्म्ही तक्रार खरी असल्याचे उघडकीस आल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. रेल्वेकडून तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.
भारतात दररोज दोन कोटीहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. त्यामुळे भारतीय रेल्वे हजारो ट्रेन चालवते. लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा प्रवास सोयीस्कर असतो. त्यामुळे बहुतांशी लोक ट्रेनच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. अशा वेळी ट्रेनचा प्रवास सुविधायुक्त आणि आरामदायी असावा अशी अपेक्षा असते. अशा वेळी ट्रेन प्रवाशांसाठी रेल्वेने काही नियम तयार केले आहेत. रेल्वेने प्रवास करताना काही नियम प्रवाशांसाठी असतात. तर काही नियम प्रवाशांच्या सोयीसाठी असतात. रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सोयीसाठी काही नियम असतात. ट्रेनमध्ये बेसिक सुविधा असणे बंधणकारक असते. तुम्ही जर एसी कोचचे तिकीट घेतले आहे तर एसी नीट काम करायला हवा.तसेच टॉयलेटमध्ये पाणी असायला हवे. जर रेल्वेकडून यात चुक झाली असेल तर रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळत असते.
रेल्वे देणार 25 हजाराची नुकसान भरपाई
विशाखापट्टनम जिल्ह्यातील जिल्हा ग्राहक लवादाने दक्षिण – मध्य रेल्वे संदर्भात एक महत्वाचा निकाल दिला आहे. या रेल्वे प्रवाशाला 25 हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. एक प्रवासी आपल्या कुटुंबासह तिरुमाला एक्सप्रेसच्या एसी कोचमधून प्रवास करत होता. प्रवासात त्या ट्रेनचा एसी बंद पडला होता. त्याने टॉटलेटमध्ये जाऊन पाहीले तर तेथे पाणी देखील नव्हते.
या कारणाने या प्रवाशांना रेल्वेला तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत विशाखापट्टनम जिल्हाय ग्राहक लवादाने दक्षिण-मध्य रेल्वेला संबंधित प्रवाशाला नुकसाई भरपाई देण्याचे आदेश दिले. रेल्वेची प्रवाशांना बेसिक सुविधा देणे बंधनकारक आहे. ज्यात एसी चालणे, टॉयलेटमध्ये पाणी असणे सर्व सामील आहे.या सविधा नसल्याने प्रवाशांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.त्यामुळे रेल्वेला संबंधित प्रवाशांना नुकसाई भरपाई द्यावी लागले असे ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे.
तुम्ही करु शकता तक्रार
जर तुम्हाला ट्रेनच्या प्रवासात अशा अडचणींचा सामना करावा लागला तर तुम्ही देखील रेल्वेच्या कार्यालयाकडे तक्रार करु शकता. तु्म्ही तक्रार खरी असल्याचे उघडकीस आल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. रेल्वेकडून तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.