पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी युवती टी शर्ट चोरताना सापडली
पुण्यातील प्रसिद्ध एफ.सी.रोडवरील शिरोळे फॅशन मार्केटमध्ये टी शर्ट चोरणाऱ्या तरुणीला (Girl stealing a T-shirt) पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. पोलिसांच्या दामिनी पथकाच्या बिट मार्शलने ही चोरी रंगेहाथ पकडली.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध एफ.सी.रोडवरील शिरोळे फॅशन मार्केटमध्ये टी शर्ट चोरणाऱ्या तरुणीला (Girl stealing a T-shirt) पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. पोलिसांच्या दामिनी पथकाच्या बिट मार्शलने ही चोरी रंगेहाथ पकडली. महत्त्वाचं म्हणजे टी शर्ट चोरणारी युवती (Girl stealing a T-shirt) पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करते.
लाल रंगाचा टी शर्ट आणि जीन्स घालून पाठीवर बॅग अडकवून ही तरुणी शिरोळे मार्केटमध्ये आली होती. तिने तिथे एक-दोन टी शर्ट पाहिले. त्यानंतर एक शर्ट हातात घेऊन तो निरखू लागली. त्यानंतर पुढे जाऊन तिने कुणाचं लक्ष नाही हे पाहात हातातील टी शर्ट थेट बॅगमध्ये कोंबला.
या तरुणीच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत होत्या. तरुणीने बिल न भरताच टी शर्ट थेट बॅगमध्ये कोंबल्याने पाठिमागून तिला आवाज देण्यात आला. त्यानंतर तिने लगबगीने टी शर्ट बॅगेतून बाहेर काढला.
हा सर्व घटनाक्रम दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला. दामिनी पथकाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित युवतीला ताब्यात घेतलं आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी असंख्य तरुण-तरुणी येतात. हालाखीच्या परिस्थितीत राहून ते दिवस काढत असतात. अनेकदा यश हुलकावणी देत असल्याने हतबल होऊन अनेक विद्यार्थी घरी परतात. मात्र अशा चोरीच्या घटना क्वचितच घडतात.
