सांगलीत दक्षिण आफ्रिकेचा आंबा दाखल, दर तब्बल……

दीपावली आणि पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील फळ बाजारात थेट दक्षिण आफ्रिकेचा आंबा दाखल झाला आहे. या आफ्रिकन आंब्यांचा दर प्रतिदोन डझनांमागे 2 हजार ते 2200 रुपये एवढा आहे.

सांगलीत दक्षिण आफ्रिकेचा आंबा दाखल, दर तब्बल......


सांगली : दीपावली आणि पाडव्याच्या मुहूर्तावर सांगली शहरातील फळ बाजारात थेट दक्षिण आफ्रिकेचा आंबा दाखल झाला आहे. या आफ्रिकन आंब्यांचा दर प्रतिदोन डझनांमागे 2 हजार ते 2200 रुपये एवढा आहे. ऐन सणासुदीच्या काळात हा आंबा सांगलीत दाखल झाल्याने त्याची चव चाखण्यासाठी नागरिक फळ बाजारात गर्दी करू लागले आहेत. (in Sangli Mangoes imported from South Africa, have price 2,200 rupees per two dozen)

दरवर्षी दिवाळी आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जातीचे, अनोखी चव असणारे आंबे सांगलीच्या बाजारामध्ये दाखल होतात. यावेळी शहरातील विष्णू अण्णा फळ बाजारामध्ये 40 पेट्या दक्षिण आफ्रिकन आंब्यांची आवक झाली आहे. ग्राहकांकडून या आंब्यांना चांगलीच पसंती मिळत आहे. या आंब्यांचा दर  प्रतिदोन डझनामागे 2 हजार ते 2200 असा आहे.

दरम्यान, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या या आंब्यांना सांगलीकरांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. नागरिक या आंब्यांची चव चाखण्यासाठी दुकानासमोर गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे आफ्रिकन आंब्यांच्या 40 पेट्यांपैकी आतापर्यंत 20 पेट्यांची विक्रीसुद्धा झाली आहे. हा आंबा मागील तीन वर्षांपासून सांगलीच्या फळ बाजारात येत आहे. या आंब्याची चव रत्नागिरीच्या आंब्यासारखी असल्यामुळे ग्राहकांकडून आफ्रिकन आंब्यांना चांगली मागणी असल्याचे विष्णू अण्णा फळ बाजारामधील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. (in Sangli Mangoes imported from South Africa, have price 2,200 rupees per two dozen)

दरम्यान, कोकणातील हापूस आंबादेखील जगभरात प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याला मागच्याच वर्षी जीआय मानांकन मिळाले आहे. इतर राज्यातला आंबा हा हापूस आंबा असल्याचे सांगत बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक केली जात होती. मात्र, हापूस आंब्याला मानांकन मिळाल्याने असे प्रकार आता घडणार नाहीत. जीआय मानांकनाशिवाय जर कोणी अन्य आंबा हापूसच्या नावे विकून फसवणूक करत असेल, तर त्याच्यावर कारवाई किंवा अटक होऊ शकते.

संबंधित बातम्या :

सर्वसामान्यांसाठी ‘गोड’ बातमी! फळांची आवक वाढल्याने किंमती घसरल्या, वाचा नवे दर

Cyclone Nisarga | कोकणात हाहा:कार, आंबा, फणस, सुपारीची झाडं जमीनदोस्त, अनेक घरांची पडझड

वावरातून फेसबुक-व्हॉट्सअ‌ॅप, सीताफळाची थेट ऑर्डर, नांदेडच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI