रत्नागिरी जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका, 27 हजार घरांची पडझड, आंबा, काजू, पोफळीच्या बागांचेही नुकसान

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील  किनारपट्टीतील गावांना जोरदार फटका (Ratnagiri Cyclone Damage)  बसला

रत्नागिरी जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका, 27 हजार घरांची पडझड, आंबा, काजू, पोफळीच्या बागांचेही नुकसान

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील  किनारपट्टीतील गावांना जोरदार फटका (Ratnagiri Cyclone Damage)  बसला. यात सर्वाधिक नुकसान हे दापोली आणि मंडणगड तालुक्याचे झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 27 हजार 782 घरांची पडझड झाली आहे. या वादळात 3200 झाड कोसळली आहे. तर हजारो वीजेचे खांबही जमीनदोस्त झाले आहेत.

निसर्ग चक्रीवादळात मनुष्यहानी झालेली नसली तरी 11 जनावरांना जीव गमवावा लागला आहे. तर दापोली आणि मंडणगडमध्ये संपर्क यंत्रणा कोलमडली आहे.

फोटो – फेसबुक

रत्नागिरी जिल्ह्यातील 57.81 हेक्टर जमिनीवरील पिकांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यात आंबा, काजू, नारळ, पोफळी बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील 41 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

फोटो – फेसबुक

यामध्ये मंडणगड तालुक्यात 7 इमारती, दापोलीतील एक महाविद्यालय, एक शासकीय गोदाम, खेडमध्ये 5 गोठे, गुहागरमध्ये 1 टॉवर, 2 शासकीय इमारती, 1 समाजमंदीर, चिपळूणमध्ये 1 शासकीय गोदाम, 1 गॅरेज, रत्नागिरीत तलाठी कार्यालय आणि मंगलकार्यालयाचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : कोकणात 5 हजार कोटींचं नुकसान, सरकारने पंचनाम्याआधी तातडीने 500 कोटींची मदत करावी : सुनील तटकरे

दरम्यान “निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात साधारणत: 5 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना 5 हजार कोटींची मदत करावी. याशिवाय पंचनाम्याआधी सरकारने तातडीने 500 कोटींची मदत करावी”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी (Ratnagiri Cyclone Damage) केली होती.

संबंधित बातम्या : 

चक्रीवादळाने कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान, अनेक ठिकाणी प्रशासन अजूनही पोहोचलेलं नाही : प्राजक्त तनपुरे

पुण्याला चक्रीवादळाचा तडाखा, अजित पवार थेट बांधावर, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *