भारताला अजून एक धक्का, जाडेजानंतर हनुमा विहारी चौथ्या टेस्टला मुकणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीपूर्वी (brisbane Test) टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे.

भारताला अजून एक धक्का, जाडेजानंतर हनुमा विहारी चौथ्या टेस्टला मुकणार
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 8:44 AM

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीपूर्वी (brisbane Test) टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजा यापूर्वीच या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यातच आता अजून एक फलंदाज ब्रिस्बेन कसोटी सामन्याला मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिडनी कसोटी सामन्यात हिरो ठरलेला हनुमा विहारी (Hanuma Vihari) मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही, तसेच आगामी इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येदेखील विहारी खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. (IND vs AUS : Hanuma Vihari is ruled out of Brisbane Test match due to Hamstring Injury)

सिडनी कसोटी सामन्यात फलंदाजी करत असताना हनुमा विहारीच्या मांडीचे स्नायू दुखावले, त्यामुळे या सामन्यात त्याने धावून रन्स काढल्या नाहीत. त्याला नीट चालताही येत नव्हते. तरीदेखील एखाद्या योद्ध्याप्रमाणे तो शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात उभार राहिला. एकवेळ अशी परिस्थिती होती की भारत सिडनी कसोटी सामन्यात पराभूत होईल, परंतु हनुमा विहारीने रवीचंद्रन अश्विनच्या साथीने किल्ला लढवला. दोघेही 42.4 षटकं मैदानात उभे राहिले. पायाच्या दुखापतीमुळे विहारी धावू शकत नव्हता. त्यामुळे दोघांनाही रन्स काढता आल्या नाहीत, त्यामुळे दोघांनी 62 धावांची भागिदारी करत सामना वाचवला. यात विहारीने 161 चेंडूत 23 धावा तर अश्विनने 128 चेंडूत 39 धावा जमवल्या.

दरम्यान, बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी असे सांगितले आहे की, चौथ्या कसोटी 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे, या सामन्यापर्यंत हनुमा विहारी फिट होऊ शकणार नाही. हा त्यामुळे त्याला या सामन्यात संधी मिळणार नाही. सामना संपल्यानंतर हनुमा विहारीच्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले. याचा रिपोर्ट मंगळवारी (आज) संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे. या रिपोर्टनंतरच विहारीच्या दुखापतीबाबत माहिती मिळेल. ही दुखापत ग्रेड वन श्रेणीतील असली तरी त्याला पुढील चार आठवडे खेळता येणार नाही. त्यानंतर त्याला रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतून जावं लागेल. केवळ ब्रिस्बेन टेस्टच नव्हे तर इंग्लंडविरोधात भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेलाही तो मुकणार आहे.

रवींद्र जाडेजाही चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार

सिडनीत कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)दुखापतग्रस्त झाला. ही दुखापत जाडेजा आणि टीम इंडियाला चांगलीत महागात पडणार असल्याचं दिसतंय. दुखापतीमुळे जाडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासह इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींमधून (India vs England) बाहेर झाला आहे, त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

ऑस्ट्रेलिया दौरा आटोपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरोधात खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडियाविरोधात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. जाडेजा टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्यात दुखापतीमुळे मोहम्मद शमी इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. जाडेजाला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान 5-6 आठवडे लागू शकतात. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे जाडेजाला इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकावे लागणार आहे.

संबंधित बातम्या:

Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला

Australia vs India, 3rd Test, 5th Day Live : संकटमोचक हनुमा विहारीला अश्विनची साथ, तिसरी कसोटी ड्रॉ

‘तू तो देवमाणूस निकला रे’; दुखापतीनंतरही आक्रमक 97 फटकावणाऱ्या ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव

तू क्रिकेटची हत्या केलीस; भाजपचे खासदार महाशय हनुमा विहारीवर भडकतात तेव्हा…

(IND vs AUS : Hanuma Vihari is ruled out of Brisbane Test match due to Hamstring Injury)

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.