India-China Face Off | लडाखमध्ये 3 इन्फन्ट्री तैनात, हिमाचलमध्येही अतिरिक्त तुकडी, चिनी संघर्षानंतर सीमेवर भारताचे किती सैन्य?

उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊ सेक्टरमध्ये सैन्य दल वाढवण्यात आले आहे. उत्तरकाशीच्या चिन्यालिसौरमध्ये हवाईदलाने धावपट्टी सक्रिय केली आहे.

India-China Face Off | लडाखमध्ये 3 इन्फन्ट्री तैनात, हिमाचलमध्येही अतिरिक्त तुकडी, चिनी संघर्षानंतर सीमेवर भारताचे किती सैन्य?
भारत-चीन सीमावाद
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 4:20 PM

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात शांतता कराराचा (Indian Army Prepare At LAC) भंग केल्यानंतर आता भारताने चीनला धडा शिकवण्याची तयारी केली आहे. लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) अतिरिक्त जवान तैनात करण्यापासून ते हिंद महासागरात नौदलाचा ताफा वाढवण्यात आला आहे. पाणी, जमीन आणि आकाशात ज्याप्रकारे भारताने आपली शक्ती प्रस्थापित केली आहे, त्याला भेदणं चीनसाठी सोपं (Indian Army Prepare At LAC) नसेल.

भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्य चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. चीनचा पूर्वइतिहास पाहता भारत सतर्क आहे. लडाखमध्ये 3 इन्फन्ट्री डिव्हिजन तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय, उंचीवर युद्धाभ्यास करणाऱ्या दोन ब्रिगेड देखील तैनात आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये अतिरिक्त सैन्य पाठविण्यात आले आहे.

उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊ सेक्टरमध्ये सैन्य दल वाढवण्यात आले आहे. उत्तरकाशीच्या चिन्यालिसौरमध्ये हवाईदलाने धावपट्टी सक्रीय केली आहे. सिक्किममध्येही सैन्य दल वाढवण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेशातही भारताने पूर्ण व्यवस्था केली आहे.

जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचलमध्ये उत्तरी लष्कराच्या कमांडमध्ये 34,000 भारतीय सैनिक तैनात आहेत. उत्तराखंडमध्ये केंद्रीय लष्कराच्या कमांडमध्ये 15,500 सैनिक तैनात आहेत. सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि बंगालमध्ये पूर्व लष्कराच्या कमांडमध्ये 1 लाख 75 हजार 500 सैनिक तैनात आहेत. याप्रमाणे भारतीय सीमेवर सध्या 2 लाख 25 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत (Indian Army Prepare At LAC).

सुकना येथे 33 कोअर, तेजपूरमध्ये 4 कोअर, रांचीमध्ये 17 माउंटन स्ट्राइक कोअर तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय, वायू सेनेकडून एलएसीला लागून असलेल्या तळांवर लढाऊ विमानांना तैनात करण्यात आलं आहे. त्यासोबतच भारताने हिंद महासागरात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच पाणी, जमीन आणि आकाशात भारत तयार आहे.

भारताकडे जास्त अनुभवी सैन्य

यादरम्यान, चीनचे संरक्षण तज्ज्ञ आणि लष्करी चिनी मासिक मॉडर्न वॅपनेरीचे संपादक हुआंग गुओझी यांनी लिहिले, ‘डोंगराळ प्रदेश आणि पर्वतीय भागातील सर्वात अनुभवी सैन्य फक्त भारताकडे आहे.. 12 विभागांमधील 2 लाख सैनिकांसह भारत हा जगातील सर्वात शक्तिशाली पर्वतीय लढाऊ दल आहे.’

हार्वर्ड कॅनेडी शाळेच्या वेलफेअर सेंटर फॉर सायंस अ‍ॅण्ड इंटरनॅशनल अफेअर्सच्या रिसर्चमध्ये म्हटलं, ‘युद्ध झाल्यास उत्तर सीमेवर भारत चीनवर भारी पडू शकतो ‘ (Indian Army Prepare At LAC).

संबंधित बातम्या :

Boycott Chinese Equipment : चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी, BSNL चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याची चिन्हं

India-China Face Off | भारताकडे सुखोई, अपाचे बोईंग, तर चीनकडे चेंगडू जे-20 आणि wz-10, कुणाकडे किती शस्त्रसाठा?

PM Modi on Ladakh face-off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी

Non Stop LIVE Update
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.