AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या पार, कोणत्या राज्यात किती रुग्ण?

देशात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (India Corona Update). देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता थेट 1 लाखांच्या पार गेला आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या पार, कोणत्या राज्यात किती रुग्ण?
| Updated on: May 19, 2020 | 4:10 PM
Share

मुंबई : देशात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (India Corona Update). देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता थेट 1 लाखांच्या पार गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 1 हजार 137 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (India Corona Update).

देशात सध्या 58 हजार 802 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर 39 हजार 173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर, बाधितांचा आकडा 35,058 वर

देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजार 58 वर पोहोचला आहे. यापैकी 1 हजार 249 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 8 हजार 437 रुग्ण बरे झाले आहेत.

दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार

दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. दिल्लीत आतापर्यंत 10 हजार 54 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4 हजार 485 रुग्ण बरे झाले आहेत. तर 168 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गोव्यात कोरोनाचा शिरकाव

गोवा राज्य काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालं होतं. मात्र, गोव्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गोव्यात आतापर्यंत 38 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 7 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुजरातमधील कोरोनाबाधितांचा आकडा 11,745 वर

गुजरातमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 11 हजार 745 वर पोहोचला आहे. यापैकी 4 हजार 804 रुग्ण बरे झाले आहेत. तर 694 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मध्यप्रदेशात 5,236 रुग्ण

मध्यप्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 236 वर पोहचली आहे. यापैकी 2 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. तर 252 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानमध्ये 5,507 रुग्ण

राजस्थानमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार 507 वर पोहोचला आहे. यापैकी 4 हजार 406 रुग्ण बरे झाले आहेत. तर 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 4,605 रुग्ण तर बिहारमध्ये 1,391 रुग्ण

उत्तर प्रदेशात आतापर्यंत 4 हजार 605 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 2 हजार 783 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 118 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिहारमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 391 वर पोहोचला आहे. यापैकी 494 रुग्ण बरे झाले आहेत. तर 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पंजाबमध्ये 1980 रुग्ण तर हरयाणात 928 रुग्ण

पंजाब राज्यात आतापर्यंत 1980 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 1 हजार 547 रुग्ण बरे झाले आहेत. तर 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर हरयाणा राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 928 वर पोहोचली आहे. यापैकी 598 रुग्ण बरे झाले आहेत. तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाखमध्येदेखील कोरोना रुग्ण

जम्मू-काश्मीर या केंद्र शासित प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 289 वर पोहोचला आहे. यापैकी 609 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशमधील कोरोनाबाधितांचा आकडा 90 वर पोहोचला आहे. यापैकी 40 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लडाखमध्ये आतापर्यं 43 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 41 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

उत्तराखंडमध्ये 93 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 52 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

झारखंडमध्ये 223 रुग्ण

झारखंड राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 223 वर पोहोचली आहे. यापैकी 123 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कर्नाटकमध्ये 1246 रुग्ण

कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 246 वर पोहोचला आहे. यापैकी 530 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये 630 रुग्ण

केरळमध्ये कोरोनाचे 630 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 497 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तमिळनाडूमध्ये 11,760 रुग्

तमिळनाडूत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 11 हजार 760 वर पोहोचला आहे. यापैकी 4 हजार 406 रुग्ण बरे झाले आहेत. तर 81 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ईशान्य भारतातील राज्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण

मणीपूरमध्ये आतापर्यंत 7 रुग्ण आढळले आहेत. मेघालय राज्यात 13 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 11 रुग्ण बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरा राज्यात आतापर्यंत 167 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 85 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आसाममध्ये 107 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 41 रुग्ण बरे झाले आहेत.

‘या’ राज्यांमध्ये कोरोनाचं संक्रमण नाही

देशात अंदमान-निकोबार द्विपसमूह, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाहीत.

संबंधित बातम्या :

Lockdown 4.0 Guidelines | महाराष्ट्रासाठी चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.