AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने भारतीय पायलटला पकडल्याचा दावा खरा? चिंता वाढली

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. यात सर्वात चिंतेचा दावा म्हणजे […]

पाकिस्तानने भारतीय पायलटला पकडल्याचा दावा खरा? चिंता वाढली
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

यात सर्वात चिंतेचा दावा म्हणजे एका भारतीय पायलटला अटक केल्याचं पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर गफूर यांनी म्हटलंय. भारताचे दोन विमान पाडले, एक काश्मीरमध्ये, तर दुसरं पीओकेमध्ये पाडलं, असा दावा पाकिस्तानने केलाय. विंग कमांडर अभिनंदन कुमार असं या पायलटचं नाव सांगत पाकिस्तानकडून व्हिडीओ जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे भारतीय हवाई दलाचा एक पायलट बेपत्ता असल्याचं हवाई दलातील सूत्रांचं म्हणणं आहे.

पाकिस्तानकडून विंग कमांडर नाव सांगत असणारा व्हिडीओ जारी करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये अभी नाव लिहिलेला पायलट दिसत आहे. पण या व्हिडीओच्या सत्यतेबाबत शंका आहे. कारण, भारताने अधिकृतपणे ही बाब अजून स्वीकारलेली नाही. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच भारताकडून भूमिका जाहीर केली जाऊ शकते.

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या भारतीय वायूसेनेने वेळीच उत्तर दिलं आणि हा प्रयत्न हाणून पाडला. विशेष म्हणजे भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं सर्वात महत्त्वाचं असलेलं F-16 हे विमान पाडल्याची माहिती आहे. हे विमान पडत असताना पाकिस्तानी पायलट पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारत असल्याचंही दिसून आलं.

व्हिडीओ पाहा :

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.