AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय सैन्याचा गणवेश बदलणार, ‘हे’ बदल होणार

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या गणवेशात लवकरच काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. या बदलामुळे भारतीय सैन्याचे अधिकारी नवीन गणवेशात दिसतील, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिली आहे. बदलते हवामान, युद्धाचे ठिकाण या सर्व गोष्टी लक्षात ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतीय सैन्याचा गणवेश हा टेरिकॉटच्या धाग्यापासून […]

भारतीय सैन्याचा गणवेश बदलणार, ‘हे’ बदल होणार
Indian Army Bharti 2021
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या गणवेशात लवकरच काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. या बदलामुळे भारतीय सैन्याचे अधिकारी नवीन गणवेशात दिसतील, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिली आहे. बदलते हवामान, युद्धाचे ठिकाण या सर्व गोष्टी लक्षात ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.

संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतीय सैन्याचा गणवेश हा टेरिकॉटच्या धाग्यापासून तयार करण्यात येतो. यामुळे उष्ण किंवा दमट भागात काम करणाऱ्या सैन्यातील अधिकारी आणि जवानांना या कपड्यांचा त्रास होतो. त्यामुळे सूती कापडाचा पर्याय भारतीय सैन्यापुढे देण्यात आला होता. मात्र त्या कापडाची काळजी घेणं कठीण असल्याचे भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं.

भारतीय सैन्याच्या गणवेशात कोणते महत्त्वपूर्ण बदल करता येऊ शकतात, याबाबत संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यदलातील अधिकारी आणि जवान यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार अनेकांनी संरक्षण मंत्रालयाला सूचना पाठवल्या आहेत.

यात काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, सीमेवर संरक्षण करत असताना अनेकदा हवामानात बदल होतात. यामुळे जवानांना युद्धावेळी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे बदलत्या हवामानाला अनुसरुन सैन्याचा गणवेश तयार करण्यात यावा, असे प्रयत्न सुरु आहेत.

सैन्यदलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या सूचनेनुसार, इतर देशातील सैन्यातील गणवेशाचा शर्ट आणि पॅटचा रंग वेगवेगळा असतो. तसेच सध्या असलेल्या गणवेशावर ‘सर्व्हिस स्ट्रीप्स’ म्हणजेच संबंधित अधिकाऱ्याचा रॅक, पद दिलं जात. या सर्व्हिस स्ट्रीप्स गणवेशात खांद्याजवळ देण्यात येतात. मात्र ही जागा बदलून ती अमेरिका किंवा इंग्लड सैन्याप्रमाणे बटणांजवळ करावी अशीही सूचना यात देण्यात आली आहे. या बदलामुळे अधिकाऱ्यांची माहिती स्पष्ट दिसू शकते.

या गणवेशासोबत असणारा आडवा बेल्ट काढून टाकण्यात येणार आहे. यामुळे जवानांना गणवेश परिधान करणे सोयीचे ठरु शकते. सध्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गणवेशात हे सर्व बदल करता येतील का? यावर संरक्षण मंत्रालयासोबत चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेत गणवेशावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात तीन वेळा बदल

भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात याआधी बऱ्याचदा बदल करण्यात आला आहे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतीय सैन्यादलाची पाकिस्तान सैन्यदलापेक्षा वेगळी ओळख निर्माण व्हावी या दृष्टीने पहिला गणवेश बदल करण्यात आला. त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात बदल करण्यात आला. बदलण्यात आलेल्या गणवेशाला ‘Disruptive Pattern (DP) battle dress’, असे नाव देण्यात आले. हा गणवेश पॉलिस्टर प्रकारच्या कापडापासून तयार केला जात होता. मात्र, या गणवेशाबाबत सैन्यदलातील जवान आणि अधिकारी नाराज होते.

या बदलानंतर बीएसएफ आणि सीआरपीएफ या दोन्ही संस्थांचे वेगळेपण जपण्यासाठी 2005 मध्ये पुन्हा एकदा गणवेश बदल करण्यात आला.

भारतीय सैन्यदलात 9 प्रकारचे गणवेश

भारतीय सैन्यदलात एकूण 9 प्रकारचे गणवेश आहेत. यांची 4 विभागात विभागणी करण्यात आली आहे. यात पहिल्या विभागात कॉम्बेट, दुसऱ्या विभागात सेरिमोनियल, तिसऱ्या विभागात पीस टाईम आणि चौथ्या विभागात मेस गणवेशचा समावेश आहे. या विभागातील गणवेशात विविध प्रकार असतात. यातील प्रत्येक गणवेशाला वेगवेगळे क्रमांक दिलेले असतात.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.