International Coffee Day | वजन कमी होते, सौंदर्य वाढवते, तुमची ‘कॉफी’ बरंच काही करते!

जगभरात ‘कॉफी’चे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ (International Coffee Day) म्हणून साजरा केला जातो.

International Coffee Day | वजन कमी होते, सौंदर्य वाढवते, तुमची ‘कॉफी’ बरंच काही करते!
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 6:57 PM

मुंबई : जगभरात ‘कॉफी’चे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ (International Coffee Day) म्हणून साजरा केला जातो. काही वर्षांपर्यंत कॉफी (Coffee) म्हणजे एक ‘उच्च वर्गीय पेय’ म्हणून ओळखले जायचे. परंतु, आता याची वाढती लोकप्रियता लक्षात घेता तुम्हाला घराघरामध्ये कॉफी पोहचलेली दिसते (International Coffee Day special Benefits of coffee).

कॉफी पिण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच सौंदर्याच्या दृष्टीने देखील कॉफी (Coffee) महत्त्वाची ठरते. कॉफीने तुमच्या शरीराला आणि तुमच्या आरोग्यासाठी बरेच फायदे (Benefits) आहेत. कॉफीचे मूळ उत्पादन आफ्रिकेतील इथिओपिया आणि सुडान येथे व्हायचे. पण आता मदगास्कर आणि मॉरिशससारख्या देशातही याचे उत्पादन होते. तर, भारतातील केरळ, कर्नाटक यासारख्या ठिकाणीदेखील तुम्हाला कॉफीचे पिक पाहायला मिळते. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने ती वजन कमी करण्यासाठीदेखील फायदेशीर ठरते. काही आजारातही कॉफी गुणकारी ठरते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते

आपल्या पैकी बऱ्याच जणांच्या त्वचेवर सुरकुत्या पडलेल्या असतात. कामाचा ताण, रोजची दगदग, वाढता तणाव याला कारणीभूत असतो. अशावेळी फायदेशीर ठरते ‘कॉफी’. कॉफीमध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात जे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात. कॅफेन आणि अँटिऑक्सिडंट्स हे महत्त्वाचे घटक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील तजेलदारपणा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच हे दोन्ही पोषक तत्त्व तुमच्या आरोग्यासाठी आणि अँटिएजिंगसाठी फायदेशीर ठरतात. (International Coffee Day special Benefits of coffee)

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

नियमित कॉफी प्यायल्याने शरीरात जमा झालेली चरबी विरघळण्यास मदत होते. ब्लॅक आणि ग्रीन कॉफी वजन कमी करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतात. ग्रीन कॉफी फॅट बर्न सप्लीमेंट म्हणून ओळखली जाते. ही तुम्ही नियमित प्यायल्यास, एका महिन्यात साधारण 10 ते 15 किलोपर्यंत वजन कमी होटे. यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक तत्त्वांचा शरीराला फायदा होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नॉर्मल कॉफीच्या तुलनेत तुम्हाला ग्रीन कॉफीचा उपयोग अधिक होतो. यामुळे शरीराचे मेटाबॉलिजमदेखील सुधारते आणि शरीरावर अधिकची चरबी जमा होत नाही.

डोळ्यांचा थकवा दूर करते

कॉफीमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे डोळ्यांखाली आलेली सूज, सुरकुत्या कमी होण्यासाठी कॉफीचा उपयोग होतो. कॉफी पावडर, त्यामध्ये वाटलेले डार्क चॉकलेट आणि पाणी घालून पेस्ट करून घ्या आणि हे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला लावा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. 5-10 मिनिट्स चेहऱ्याला हे लावून थंड पाण्याने धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात बदल दिसेल. डोळेही तजेलदार दिसतील.

लिव्हरसंबंधित आजारासाठी उपयुक्त

कॉफीचे सेवन लिव्हरसंबंधित आजारामध्येही लाभदायक ठरते. एका रिसर्चमध्ये सिद्ध झाले आहे की, नियमित स्वरुपात कॉफीचे सेवन केल्यामुळे लिव्हरसंबंधित आजार कमी होतात. कॉफी साखरेशिवाय दिवसातून साधारण दोन ते तीन ग्लास प्यायल्यामुळे यकृतासंबंधित आजार दूर राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉफी थंडगार करून पिऊ नये. ब्लॅक कॉफी गरम गरम प्यायल्यानेच अधिक फायदा होतो.

**(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(International Coffee Day special Benefits of coffee)

हेही वाचा : 

फॅट टू फिट… मुंबईतील 132 किलो ‘वजनदार’ महिला कॉन्स्टेबलचा प्रवास

सानियाचा फिटनेस फंडा, केवळ 5 महिन्यात तब्बल 22 किलो वजन घटवलं

फिट राहण्यासाठी आता जिममध्ये जाण्याची गरज नाही

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.