International LeftHanders Day : जगातील 10 प्रसिद्ध डावखुरे व्यक्ती!

13 ऑगस्ट हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस' (International LeftHanders Day) म्हणून साजरा केला जातो. डावखुऱ्या लोकांची संख्या ही जगातील एकूण लोकसंख्येच्या केवळ 10 टक्के आहे. म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

International LeftHanders Day : जगातील 10 प्रसिद्ध डावखुरे व्यक्ती!
Follow us
| Updated on: Aug 13, 2019 | 4:16 PM

मुंबई : 13 ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस’ (International LeftHanders Day) म्हणून साजरा केला जातो. डावखुऱ्या लोकांची संख्या ही जगातील एकूण लोकसंख्येच्या केवळ 10 टक्के आहे. म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्याही आसपास, घरात, मित्रांमध्ये कुणीतरी असं असेल जो डावखुरा आहे. डावखुऱ्या लोकांच्या नशिबात राजयोग असतो, असं म्हणतात. आता हेच बघा ना जगातील अनेक दिग्गज हे डावखुरे आहेत. त्यांना अहोरात्र मेहनत करुन स्वत:ला सिद्ध करत यश प्राप्त केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा हा दिवस साजरा करण्यात काही चुकीचं नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा काही डावखुऱ्या लोकांबद्दल जे या जगात अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत.

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) :

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीही डावखुरे होते. देशाला 150 वर्षांच्या ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधींजींचा मोठा वाटा होता, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. सरकारी कार्यालय ते भारतीय नोटांवरील त्यांचा फोटो त्यांची महानता दाखवण्यासाठी पुरेसा आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) :

बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडचं एक संपूर्ण दशक गाजवलं. त्यांचे सिनेमे लोक आताही तितक्याच आवडीने पाहतात. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी फक्त भारतातील जनतेलाच नाही संपूर्ण जगाला वेड लावलं. आपले हेच शहेनशाह देखील डावखुरे आहेत.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) :

क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर हा सुद्धा डावखुरा आहे. पण फलंदाजी करताना तो उजव्या हाताने खेळतो. मात्र, ऑफफिल्ड तो डावखुरा आहे.

बराक ओबामा (Barak Obama) :

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे देखील डावखुरे होते. ते अमेरिकेचे एकमेव कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यांच्या साध्या राहणीमानाने त्यांनी सर्वांच्या मनात एक आदरयुक्त स्थान प्राप्त केलं.

सनी लियोनी :

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी ही देखील डावखुरी आहे. तिने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) :

सोशल मीडियाच्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्म फेसबुकवर लोकांना एकमेकांशी जोडणारे मार्क झुकरबर्ग हे देखील डावखुरे आहेत. आज ते जागातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्कचे बादशाह आहेत.

शिखर धवन (Shikhar Dhawan) :

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन हा देखील डावखुरा आहे. सौरभ गांगुलीनंतर टीम इंडियाला शिखर धवनच्या रुपात दुसरा महान डावखुरा खेळाडू मिळाला आहे.

बिल गेट्स (Bill Gates) :

जगातील सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स हे देखील डावखुरे आहेत.

युवराज सिंग (Yuvraj Singh) :

टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग हा सुद्धा डावखुरा आहे. तो तीन वेळा विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होता.

अँजेलीना जोली (Angelina Jolie) :

हॉलिवूडची अभिनेत्री अँजेलीना जोली ही जगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आजवर अनेक गाजलेले अॅक्शन आणि रोमँटिक सिनेमे केले आहेत. अँजेलीना जोली ही देखील डावखुरी आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.