IT workers agitation | पुणे, मुंबई, दिल्लीसह आयटी कर्मचारी एकवटले, नोकर कपातीविरोधात देशव्यापी आंदोलन

देशभरातील आयटी कर्मचारी नोकरकपातीविरोधात  (IT industry workers agitation) आक्रमक झाले आहेत. त्यांनी 'जस्टीस फॉर एम्पलॉईज' हे ऑनलाईन आंदोलन सुरु केलं आहे.

IT workers agitation | पुणे, मुंबई, दिल्लीसह आयटी कर्मचारी एकवटले, नोकर कपातीविरोधात देशव्यापी आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 9:40 PM

पुणे : देशभरातील आयटी कर्मचारी नोकरकपातीविरोधात  (IT industry workers agitation) आक्रमक झाले आहेत. आयटी कर्मचाऱ्यांनी ‘जस्टीस फॉर एम्पलॉईज’ हे ऑनलाईन आंदोलन सुरु केलं आहे. नोकरी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनात आतापर्यंत देशभरातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरुसह इतर शहरातील आयटी कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिनेटनं याविरोधात आवाज उठवला आहे.

लॉकडाऊनमुळे आयटी उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पगार कपात केली. तर काहींना नोकरी गमवावी लागली आहे. पुणे-मुंबईतील 68 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली. राज्यात 6 लाख आयटी कर्मचारी असून साडेतीन ते चार लाख पुण्यात आहेत. पुणे परिसरातील विविध आयटी कंपनी, बीपीओ आणि केपीओत ते काम करतात. (IT company)

आयटी कंपन्यांकडून सरकारी नोटीसला केराची टोपली 

मात्र अनेक कंपन्यांनी 50 टक्‍क्‍यांपर्यंत वेतन कपात केली आहे. तर काही कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. यासंदर्भात सरकारनं कर्मचारी अथवा वेतन कपात न करण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर कामगार आयुक्तांनी काही नामांकित कंपन्यांना नोटीस बजावल्या. मात्र आयटी कंपन्यांनी या नोटीसला केराची टोपली दाखवली.

सद्यस्थितीत अनेक कंपन्यांमध्ये ठरवून दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरु आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. मात्र यामध्ये अनेक अडचणी असल्याचे कर्मचारी सांगतात. (IT industry workers agitation)

संबंधित बातम्या 

Lockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट   

कर्मचारी आणि वेतन कपात कराल तर खबरदार, पुण्यातील आयटी कंपन्यांना कामगार विभागाची नोटीस 

पुण्यात कन्टेन्मेंट झोन वगळून आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी 

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.