चीनच्या घुसखोरीला कंटाळून जपानचा मोठा निर्णय, ड्रॅगनला रोखण्यासाठी अमेरिका, फ्रान्सशी जवळीक वाढवणार

Yuvraj Jadhav

|

Updated on: Dec 07, 2020 | 11:07 AM

चीन आणि जपान यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून चीनच्या घुसखोरीमुळं वाढला आहे. (Japan will conduct military drill with America and France )

चीनच्या घुसखोरीला कंटाळून जपानचा मोठा निर्णय, ड्रॅगनला रोखण्यासाठी अमेरिका, फ्रान्सशी जवळीक वाढवणार
Follow us

टोकियो: जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैन्यातील झटापटीनंतर दोन्ही देशामधील संबंध बिघडले आहेत. आता चीन आणि जपान यांच्यातील संबंधातदेखील तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनने जपानच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी सुरु केली आहे. चीनचे नौदल आणि हवाई दल मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहे. यामुळे जपानने मोठा निर्णय घेतला आहे. जपानने अमेरिका आणि फ्रान्सच्या सैन्यासोबत संयुक्त लष्करी युद्ध सराव करण्याचं ठरवलं आहे. पूर्व चीन समुद्रात तीन देशांच्या लष्करांचा संयुक्त युद्ध सराव होणार आहे. (Japan will conduct military drill with America and France )

सैकई या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार जपान सागरी किनाऱ्याजवळ अमेरिका आणि फ्रान्सच्या सैन्यासोबत संयुक्त युद्धसराव करेल. या तीन देशांचे सैन्य आगामी काळात नैसर्गिक आणि इतर आपत्तींच्यावेळी बचाव आणि मदतकार्यही संयुक्तपणे करणार आहेत.

जपानच्या लष्करी क्षेत्रातील जाणकारांच्या मते चीनविरोधात जपान ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. संयुक्त लष्करी सराव जपानच्या मालकीच्या बेंटावंर होणार आहे. फ्रांन्सच्या नौसेनेचे अ‌ॅडमिरल पियरे वांडियर यांनी यांनी लष्करी सरावामुळं दोन्ही देशातील सहकार्य वाढणार असल्याचे सांगितले. पूर्व चीन समुद्रामध्ये फ्रान्सला ताकद दाखण्याची संधी असल्याचेही वांडियर यांनी सांगितले. (Japan will conduct military drill with America and France )

चीन-जपान वादाचं कारण

संयुक्त लष्करी सरावाबाबत जपानकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, चीन आणि जपान यांच्यातील पूर्व चिनी समुद्रातील बेटांवरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहे. त्या बेटांवर जपाननं दावा केलेला आहे. मात्र, चीन ती बेटं त्यांच्या हद्दीत येतात, असा दावा करतंय. 1972 पासून वाद असलेली बेट जपानच्या ताब्यात आहेत. जपान त्या बेटांना सेनकाकू म्हणते तर चीन डियाओस म्हणते. सद्यपरिस्थितीत ही बेटं जपानच्या ताब्यात आहेत. चीननं लष्करी बळाचा वापर करुन डियाओसचा ताबा घेऊ, असा इशारा यापूर्वी दिला आहे. आगामी काळात चीन आणि जपान यांच्यातील तणाव वाढत गेला तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO| भारताचा अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासोबत युद्ध सराव; चीन अस्वस्थ

Pandharpur Corona | जपानवरुन पंढरपुरात आलेला चिमुकला कोरोना पॉझिटिव्ह

Narendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण

(Japan will conduct military drill with America and France )

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI