AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दादा, कोरोनाचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका, काळजी घ्या’, जयंत पाटलांचा टोला

दादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या.

'दादा, कोरोनाचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका, काळजी घ्या', जयंत पाटलांचा टोला
| Updated on: Apr 12, 2020 | 3:01 PM
Share

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालनियुक्त आमदार होऊ शकत नाहीत (Jayant Patil Criticize Chandrakant Patil)  यावरुन उठलेला वाद आता कोरोनावर येऊन पोहोचला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईवरुन जयंत पाटील (Jayant Patil) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडी सरकारच्या घटक पक्षांचं योगदान काय असा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबतची बातमी ‘टीव्ही 9 मराठी’ ने दिली होती. यांच्या टीकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन (Jayant Patil Criticize Chandrakant Patil) उत्तर दिलं आहे.

“दादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या”, असं म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना चिमटे काढले आहेत.

“चंद्रकांतदादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरु नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागल तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला. आपलाच, जयंत पाटील”, असं ट्विट जयंत पाटलांनी केलं आहे.

“चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते”, असही जयंत पटलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास @ncpspeaks हे फेसबुक व ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल”, असंही त्यांनी म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेवर नियुक्ती सदस्य करण्यावरुन चंद्रकांत पाटलांनी प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्री हे राज्यपाल कोट्यातून आमदार होऊ शकत नाही, घटनात्मकदृष्ट्या तसं होऊ शकत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर जयंत पाटील यांनी विरोधी पक्षांना कोरोनाविरोधातील कामावर लक्ष देण्यास सांगितलं होतं (Jayant Patil Criticize Chandrakant Patil).

जयंत पाटलांच्या या टीकेवर प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा पाढा वाचला. तसेच, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा, असा सल्लाही दिला. यावर आता जयंत पाटलांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे. जयंत पाटलांच्या (Jayant Patil Criticize Chandrakant Patil) या ट्विटनंतर आता चंद्रकांत पाटील यावर काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट

राज्यपाल नियुक्त सदस्यावरुन चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट, जयंत पाटलांचं उत्तर

जयंतराव, काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना कुठे आहे? भाजपचे हजारो कार्यकर्ते कोरोना लढ्यात : चंद्रकांत पाटील

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.